शवविच्छेदनासाठी येऊ नका; आरोग्य विभागाचे पोलिसांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने या ठिकाणी पोलिस केसेस न आणण्याचे पत्र प्राप्त झाल्याने मोठी चिंता वाढली आहे. त्यामुळे फिर्यादीवर आरोग्य उपचार व आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्याची चिंता पडली असल्याने सिल्लोडला उपजिल्हा रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे.

- शेख शकील, पोलिस निरीक्षक, सोयगाव

सोयगाव : सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी वैद्यकीय केसेस व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात येऊ नये या ठिकाणी काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. मनुष्यबळ नसल्याने पोलिसांनी वैद्यकीय प्रकरणे व शवविच्छेदनासाठी दुसरा पर्याय शोधावा, असे पत्रच चक्क आरोग्य विभागाने सोयगाव आणि फर्दापूर पोलीस ठाण्यांना बुधवारी दिल्याने खळबळ उडाली.

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीच नाही. एकट्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.बी. कसबे तालुक्याच्या आरोग्याचा भार सांभाळत आहे. त्यामुळे सोयगावची आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून, पोलिसांसाठी आता ग्रामीण रुग्णालयाची दरवाजे कायमचे बंद करण्यात आली आहे. एक लाख रुग्णांच्या आरोग्याची देखभाल करणाऱ्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य उपसंचालक औरंगाबाद यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आदेशावरून सोयगावला 27 दिवसांसाठी जिल्ह्यातील २७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिदिन महिनाभर प्रतिनियुक्ती केली होती. परंतु या २७ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाल संपल्याने आठवडाभरापासून सोयगावचे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना झाले असल्याने चक्क आरोग्य विभागाने सोयगाव आणि फर्दापूर पोलिस ठाण्यांना या ठिकाणी वैद्यकीय केसेस व शवविच्छेदनासाठी न येण्याचा लेखी अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे पोलिसांना मोठा प्रश्न पडला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिस प्रकरणात झालेली वादावादीच्या गंभीर रुग्णांना औषधप्राशन केलेल्या रुग्णांना व आत्महत्या केलेल्यांचे शवविच्छेदन रुग्णालयात मनुष्यबळ अभावी केले जाणार नाही. त्यामुळे पोलिसांनी यापुढे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात अशा प्रकारचे रुग्ण अाणू नये, असा इशाराच दिला असल्याने पोलिसांची गुंतागुंत वाढली आहे.

एकाच दिवसातील दोन आकस्मिक मृत्यूची नोंद

दरम्यान मंगळवारी सोयगाव तालुक्यात म्हशीकोठा ता.सोयगाव येथे तरुण शेतकऱ्याने घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सोयगाव शहरात एका बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर पाचोरा जि. जळगाव येथे तर सोयगावच्या बस आगारातील चालकावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात अजिंठा ता.सिल्लोड येथून सर्जन बोलावून रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याची वेळ पोलिसांवर आली होती.

कोट-२)सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रभार घेतल्यापासून या ठिकाणी मनुष्यबळ कमी पडत असल्याने आरोग्यसेवा ढेपाळली आहे.दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवा पुरविणे अशक्य झाले असल्याने पोलिसांना तात्पुरती व्यवस्था करण्याचे लेखी पत्र आदेशावरून देण्यात आले आहे. डॉ,एस.बी कसबे वैद्यकीय अधीक्षक सोयगाव....

Web Title: Do not come here for postmortem Letter from Health Department to Police