वीस, पन्नास, शंभरच्या नोटांचा साठा करू नका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नाशिक - गेल्या मंगळवारी जाहीर केल्यानुसार रिझर्व्ह बॅंकेने दोन हजाराच्या नोटेपाठोपाठ 500 रुपयांच्या नोट चलनात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. कमी दर्शनी मूल्यांच्या नोटा योग्य प्रमाणात असल्याने नागरिकांनी घाबरून उगाचच कमी मूल्यांच्या नोटांचा साठा करू नये, असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेने केले आहे. आज रिझर्व्ह बॅंकेने त्याविषयी घोषणा केली. 

साठेबाजीने वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांची टंचाई होण्याची भीती रिझर्व्ह बॅंकेला वाटत असल्याने हे आवाहन करण्यात आले आहे. नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या स्वाक्षरीची पाचशेच्या नोटेची ई सिरीज नोट राखाडी रंगाची असेल. 66 बाय 150 मिमीच्या नोटेवर दर्शनी भागावर उजव्या बाजूला पाहणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे चित्र आहे. तर, मागील बाजूला लाल किल्ला आणि स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह आहे. 

Web Title: do not store Twenty, fifty, hundreds of notes