बारावीपर्यंत मोबाईलचा वापर टाळावा  - मधुकर कड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नाशिक रोड  - नवीन तंत्रज्ञानामुळे जगाची माहिती मिळते. पाठ्यपुस्तकाऐवजी मोबाईलवरून विद्यार्थी गुगलचा अभ्यास करतात. परंतु या ज्ञानाचा फायदा करण्यापेक्षा मोबाईलद्वारे व्हॉट्‌सऍप, फेसबुकचा गैरवापर केल्यास सायबर गुन्हे दाखल होतात. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान बारावीपर्यंत मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. 

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या आरंभ महाविद्यालयात "सायबर गुन्हे व सुरक्षितता' या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य प्र. ला. ठोके अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य सुनील हिंगणे, तुषार म्हस्के आदी उपस्थित होते. 

सांस्कृतिक विभागप्रमुख संगीता मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील हिंगणे यांनी आभार मानले. राजेंद्र शेळके, कैलास निकम, प्रदीप वाघ, केशव रायते, राजेश खताळे, प्रतिभा औटी, सुरेखा पवार, संदीप निकम, यशवंत सूर्यवंशी, नीलेश खैरनार, आनंद खरात, श्रीकृष्ण लोहोकरे, विलास सानप, श्रीमती गोसावी, संदीप गांगुर्डे, दीपक पर्वतीकर, अर्पणा बोराळे, श्रीमती नकाळे, प्रवीण खैरे, श्रीमती सुरवाडे आदी उपस्थित होते. 
 
Web Title: Do not use mobile till 12th say madhukar kad