गेल्या अडीच वर्षांत कुत्र्यांचा 1 हजार 371 जणांना चावा 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 4 मे 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. गेल्या अडीच वर्षांत लहान मोठ्या अशा 1 हजार 371 जणांना चावा घेतल्याच्या घटना या भागात घडल्याचे आरोग्य विभागाकडे असलेल्या नोदींवरून समोर आले आहे.

अशा परिस्थितीत तालुक्‍यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

मेहुणबारे (चाळीसगाव) : परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. गेल्या अडीच वर्षांत लहान मोठ्या अशा 1 हजार 371 जणांना चावा घेतल्याच्या घटना या भागात घडल्याचे आरोग्य विभागाकडे असलेल्या नोदींवरून समोर आले आहे.

अशा परिस्थितीत तालुक्‍यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

मेहुणबारेसह परिसरातील बहाळ, खेडगाव, दहिवद, शिदवाडी, भऊर, वरखेडे, तिरपोळे, रामनगर, पोहरे, दडपिंप्री, लोंढे, कृष्णापुरी, दरेगावसह इतर लहान मोठ्या गावांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली आहे.

घोळक्‍याने फिरणारे मोकाट कुत्रे वृद्धांसह महिलांच्या अंगावर धावून जातात. सध्या या भागात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते. अशावेळी मोकाट कुत्र्यांकडून हल्ला होण्याची भीती असते. काही वेळा कुत्री घोळक्‍यासह हल्ला करतात. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. बऱ्याचदा पायी चालणाऱ्या ग्रामस्थांवर कुत्र्यांनी पाठीमागून येऊन हल्ला केल्याच्या घटना यापूर्वीच घडल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना अंगणवाडी किंवा शाळेत सोडताना पालकांना स्वतः जावे लागते. धुळे, मालेगाव, चाळीसगाव भागातील मोकाट कुत्रे मेहुणबारे परिसरात सोडून दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

चार महिन्यात 266 जणांना चावा 
मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 266 जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. लोंढे, दहिवद, खेडगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लस उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील रूग्ण मेहुणबारे रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, येथेही सध्या लसीचा तुटवडा जाणवत आहे. मागील महिन्यात विजय पाटील, साहेबराव कोळी, तात्या सोनवणे, अनिल केदार, रमेश अहिरे, समाधान मासरे, संजय पगारे, सचिन पाटील, राजेश गोपाळ, दीपक राठोड, नीतेश चव्हाण, उमेश बागूल, हर्षल पाटील, लक्ष्मण पाटील, बापू पाटील, अनिल जगताप, खुशाल सोनवणे, पूजा ठाकरे, मयुरी गायकवाड यांच्यासह इतरांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. 

अशी घ्यावी काळजी -
- कुत्रा चावल्यावर जखम त्वरित स्वच्छ पाण्याने धुवावी. जखमेवर गरम पाण्याची धार सोडावी. 
- जखमेवर स्पिरीट, टीचर, आयोडीनसारखे जंतूनाशक लावावे. जखमेवर पट्टी बांधू नये. 
- कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. 
- दंश करणाऱ्या कुत्र्यावर पाळत ठेवावी. दहा दिवसाच्या आत तो मेला तर रेबीज होणार आहे, हे निश्‍चितच असते. 
- कुत्र्याशी संपर्क येणार असल्यास 'प्रीएक्‍सपोजर' रेबीज लसीकरण करून घ्यावे. 

रेबीजच्या लसची कमतरता 
चाळीसगाव तालुक्‍यात दोन, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सद्यःस्थितीत दोन अथवा तीनच रेबीजची लस उपलब्ध आहे. काही ठिकाणी तर एकही नाही. बऱ्याचदा लस उपलब्ध नसल्याने रूग्णांना खाजगी किवा तालुक्‍याच्या ठिकाणी जावे लागते. मेहुणबारे परिसरातील घटना पाहता, लसी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे. 

अडीच वर्षांतील कुत्रा चावल्याच्या घटना 
2016 .......... 622 
2017 .......... 466 
2018 .......... 283 

मेहुणबारे भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यावर घ्यावयाची लस शिल्लक नाही, असे कधी घडलेच नाही. आम्ही मागणी केली आहे. तरी लवकरात लवकर "रेबीज'च्या लसी उपलब्ध होतील. 
- डॉ. देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव 

Web Title: dog bytes 1371 people in 2 and half years