Deshmukh-Rawal
sakal
धुळे: राज्यासह जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पाच दशकांपासूनचे देशमुख-रावल यांच्यातील कट्टर वैमनस्य सर्वश्रुत ठरले. मात्र, दोंडाईचा नगर परिषदेच्या सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीत या संबंधाला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. यात देशमुखी बेरकी राजकारणाने धूर्त, धुरंधर रावल यांच्या माध्यमातून भाजपची मोट धरत वैमनस्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.