येवल्यातील पाणीप्रश्नांवर संकुचित राजकारण करू नका : भागवत सोनवणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

येवला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सवंग प्रसिद्धीसाठी गावपुढारी छगन भुजबळ यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वावर टीका करत आहेत. अशा टीकाकारांना त्यांची जागा दाखवली जाईल आणि सडेतोड उत्तर दिले जाईल असे जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी म्हटले आहे. मांजरपाडा भुजबळच पूर्ण करतील. त्यामुळे येवल्यातील पाणीप्रश्नांवर संकुचित राजकारण करू नये असेही आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

मांजरपाडा खरेच रखडला का आणि रखडला असेल तर कोणामुळे या बद्दल वस्तुस्थिती सांगण्यासाठी सोनवणे यांनी सोशल मीडियातून तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे. आघाडी सरकारमुळे मांजरपाडा रखडला आणि भुजबळ यांनी कालवा दुरुस्तीचा देखावा केला असे भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. जिल्हा परिषदेला डिपॉझिट जप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांला त्याचा पक्ष ही हिंग लावून विचारत नसताना पालकमंत्र्याबरोबरचे जुने फोटो प्रसिद्धीस देऊन आपणच तालुक्याचे पाणीप्रश्न सोडवित असल्याच्या आव आणून निवडणुकीत स्वतःच्या घोडे बाजारातील भाव वाढवण्यासाठी काही लोक तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर राजकारण करत असल्याची टीका सोनवणे यांनी केली आहे.

मांजरपाडा विषय फक्त भुजबळ यांच्या कार्यकाळात मार्गी लागला, निधीही मिळाला आणि अंतिम टप्यापर्यत कामे ही झाली आहेत. भूजबळांमुळेच या वळण योजनेचा ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये समावेश झाला आहे. आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात भाजपचे एजंट असलेले जलसंपदा मधील विजय पांढरे यांच्यासारखे काही निवृत्त अधिकारी यांनी संपूर्ण राज्यातील सर्वच जल सिंचन प्रकल्पा विरोधात आरोपांची राळ उठवून दिली.तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष व आताचे मुख्यमंत्री यांनी गाडी भर पुरावे देतो सांगून सिंचन प्रकल्पामधील भ्रष्टाचारा बद्दल संभ्रम निर्माण करून सिंचन प्रकल्प रखडवले असाही आरोप सोनवणे यांनी केला आहे.भूजबळानी विधिमंडळ कारकिर्दीमध्ये कधी नव्हे ते मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांजरपाडा प्रकल्पासाठी वेलमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केले होते.जे झाले ते भुजबळांच्या प्रयत्नाने झाले असून भुजबळ हेच मांजरपाडचे शिल्पकार आहेत,असेही सोनवणे यांनी म्हटले आहे.

Web Title: dont do the politics on yeola water problem said bhagat sonawane