Vidhan Sabha 2019 : डॉ.अमोल कोल्हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार (ता.११) व शनिवार (ता.१२) ऑक्टोबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार आहे.

नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार (ता.११) व शनिवार (ता.१२) ऑक्टोबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार आहे.

शुक्रवारी (ता.११) डॉ. अमोल कोल्हे यांची आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ सकाळी ११ वाजता मुंजवाड (ता.बागलाण) येथे सभा होणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ दिंडोरी येथे १२.३० वाजता सभा होणार आहे. दुपारी ३ वाजता ऍड.माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सिन्‍नर येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता   आ.पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ७.३० वाजता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ येवला येथे जाहीर सभा होणार आहे. दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११  वाजता आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ कळवाडी ता. मालेगांव येथे जाहीर सभा घेणार आहे. त्यानंतर मालेगाव बाह्यचे उमेदवार डॉ.तुषार शेवाळे व मालेगाव मध्यचे उमेदवार शेख आसिफ शेख यांच्या प्रचारार्थ मालेगांव येथे जाहीर सभा घेणार असून दुपारी १.३० ते ५ या वेळेत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप, पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अपूर्व हिरे व देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरात रोड शो व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol Kolhe visits Nashik for two days