माजी मंत्री देशमुख कोठडीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

दोंडाईचा पालिकेने कॉंग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात राबविलेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी माजी कामगार व न्यायविधी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा जिल्हा न्यायालयाने काल (ता. 22) जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांना रात्री अटक झाली.

धुळे - दोंडाईचा पालिकेने कॉंग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात राबविलेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी माजी कामगार व न्यायविधी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा जिल्हा न्यायालयाने काल (ता. 22) जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांना रात्री अटक झाली. त्यांना न्यायालयाने आज 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. देशमुख हे तपासकामात मदत करीत नसल्याने पोलिस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला होता.

तो ग्राह्य मानून न्यायालयाने त्यांची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. दोंडाईचा पालिकेतर्फे एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2008 ते 2015 या कालावधीत 77 कोटींच्या निधीतून घरकुल योजना राबविण्यात आली. शासकीय निधीचा व्यवहार या संशयितांच्या बॅंक खात्यावर दिसून येत असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Hemant Deshmukh Police Custody Crime