डॉ. लहाडे अद्यापही मोकाट का? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

डॉ. लहाडे यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल होऊनही त्या पोलिसांच्या हाती लागत नसतील, तर पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका येते. गर्भपातासारखा गंभीर गुन्हा असताना अजूनही पोलिस काय करताहेत? 
-सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

नाशिक - नाशिक जिल्हा रुग्णालयातील गर्भपातप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले असले, तरी त्यांना अद्याप अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज प्रश्‍नचिन्ह उभे केले. 

सुळे यांनी आज डॉ. लहाडे यांच्यावरील कारवाईची माहिती नाशिक जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. आरोग्य विभागाकडून चौकशी अहवाल सादर झाला असून, डॉ. लहाडेंविरोधात दोन गुन्हे दाखल झाले असले, तरी त्यांना अद्याप अटक न झाल्याने सुळे यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. या प्रकरणी पोलिसांची कार्यपद्धती संशयास्पद असून, पोलिस काय करीत आहेत, असा सवाल सुळे यांनी या वेळी उपस्थित केला. 

डॉ. लहाडेंविरुद्ध कडक कारवाई करावी, जेणेकरून शासकीय रुग्णालयात असे गैरकृत्य करण्याचे धाडस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे होणार नाही, असेही सुळे म्हणाल्या. 

Web Title: Dr. lahade issue