Maharashtra Day : अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदुरबारची देशात ओळख : डॉ. विजयकुमार गावित

While hoisting the flag in the main government program on Maharashtra Day, Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit
While hoisting the flag in the main government program on Maharashtra Day, Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit esakal

Nandurbar News : ज्याप्रमाणे राज्याचा ६३ वा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आहोत, त्याचप्रमाणे चालू वर्ष नंदुरबार जिल्ह्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या २५ वर्षांत जिल्हानिर्मितीसह येथील सर्वच क्षेत्रांतील प्रगतीची वाटचाल थक्क करणारी आहे. (Dr Vijayakumar Gavit statement about Recognition of Nandurbar as leading developed district in country news)

वाढत्या दळणवळण आणि सिंचनाच्या नव्या संधींमुळे राज्यातील नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख देशात व राज्यात झाली आहे, असे गौरवोद्‍गार आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काढले.

महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, जातपडताळणी समितीचे सहआयुक्त अर्जुन चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मुख्याधिकारी पुलकित सिंह, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

While hoisting the flag in the main government program on Maharashtra Day, Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit
Nandurbar Municipality News : एंक्रोचमेंट हॉटस्पॉट ते इकॉलॉजिकल हॉटस्पॉट मोहीम

सतर्क राहण्याचे आवाहन

या भागातील रस्ते विकासासह पूल दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, गाव-पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्यांशी जोडले जाणार आहेत. आदिवासी भागातील गाव, वाडे-वस्त्यांवर आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सविधा पुरविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून कामे जलदगतीने पूर्ण केली जाणार आहेत.

आदिवासी विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, नवे वाळू वितरण धोरण, मुख्यमंत्री सहाय्यक कक्ष, ग्रामपंचायतींचा विकास, जलजीवन मिशन जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना व जिल्हा नियोजनाच्या तरतुदींचा गोषवारा सांगत, कोरोनाबाबत सतर्क राहण्याचेही आवाहनही त्यांनी या वेळी जिल्हावासीयांना केले.

While hoisting the flag in the main government program on Maharashtra Day, Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit
Metro Neo Project : ‘मेट्रो निओ’ साठी चेहेडी, गंगापूर येथे जागा; ‘महामेट्रो’ कडून मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com