पिण्यायोग्य पाणी वापरणे बर्फ उत्पादनासाठी बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

जळगाव - कोणत्याही अशुद्ध पाण्याने तयार केलेल्या बर्फामुळे होणारे आजार व त्याबाबत वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विनारंगाचा खाद्य बर्फ उत्पादन करताना केवळ पिण्यायोग्य पाणीच वापरावे. बर्फ उत्पादकांसह विक्रेते व व्यावसायिकांनीही या आदेशाचे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

बर्फ उत्पादनासाठी वापरले जाणारे अशुद्ध पाणी, त्यातून तयार होणारा निकृष्ट बर्फ व त्यामुळे होणाऱ्या आजारांच्या पार्श्‍वभूमीवर अन्य व औषध प्रशासनाने खाद्य व अखाद्य दर्जाच्या बर्फासाठी अन्न सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत नवीन नियमावली अधिसूचनेद्वारे जारी केली आहे. 

असे आहेत नियम 
नव्या नियमावलीनुसार खाद्य दर्जाचा बर्फ विनारंगाचा व अखाद्य दर्जाचा बर्फ निळसर रंगाचा असेल. खाद्यदर्जाचा बर्फ शुद्ध, पिण्यायोग्य पाण्यापासून बनवणे बंधनकारक आहे. सर्व रसवंती, ज्यूस विक्रेते, बर्फ गोला विक्रेत्यांसह अन्नपदार्थ व्यावसायिकांनी विनारंगाचा खाद्यदर्जाचा बर्फ वापरणे बंधनकारक आहे. व्यावसायिकांनी रंगयुक्त अखाद्य दर्जाचा बर्फ वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच अखाद्य दर्जाचा बर्फ तयार करताना त्यात indigo carmine अथवा brilliant blue FCF हे खाद्यरंग निळछटा येईल एवढ्या अल्प प्रमाणात (किमान १० पीपीएम) वापरावे. अखाद्य दर्जाचा बर्फ विनारंग असलेला उत्पादित केल्यास तो खाद्यदर्जाचा गृहीत धरून अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांनी दिला आहे. 

Web Title: drinking water use ice production