विचित्र अपघातात चालक ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर आज विचित्र अपघातामध्ये कंटेनरचालकाचा बळी गेला. कंटेनर सुरू ठेवून चालक पत्ता विचारण्यासाठी खाली उतरल्यानंतर उरातामुळे कंटेनर धावू लागला. हे पाहताच कंटेनर रोखण्यासाठी चालक कंटेनरमध्ये चढण्याच्या प्रयत्न करत असतानाच तो कंटेनरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला; तर कंटेनर तीन दुचाकींचा चुराडा करीत रस्त्यालगतच्या टपरीला धडकला. यात दोन दुचाकीस्वार थोडक्‍यात बचावले; तर टपरीचालक महिलाही वाचली. याप्रकरणी पोलिस माहिती घेत असून, मृत कंटेनर चालकाचे नाव समजू शकलेले नाही.
Web Title: driver death in accident