Dhule Accident News : ट्रकवर कार आदळून भदाणेजवळ चालक ठार

 accident news
accident newsesakal

Dhule News : महामार्गावरील गतिरोधकाजवळ थांबलेल्या ट्रकवर मागून येणारी कार आदळून अपघात झाला.

त्यात कार चालक ठार झाला. ट्रक सोडून चालक पळून गेला. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Driver killed after car collides with truck near Bhadane Dhule Accident News)

सुरत- नागपूर महामार्गावरील भदाणे (ता. धुळे) शिवारात हा अपघात झाला. मोहन गोबा सरक (वय ३२, रा. इच्छापूर, ता. साक्री) असे मृत कार चालकाचे नाव आहे.

चौदा मेस रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रक (जीजे २६ टी ३६५८) भरधाव जात होता. ट्रक चालकाने गतिरोधक पाहून ब्रेक लावला.

त्यामुळे मागून येणारी कार (एमएच १८ बीसी ०१३२) ट्रकवर धडकली. त्यात कारमधील चालक मोहन सरक यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याबाबत शिवा थोरात यांच्या फिर्यादीनुसार अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 accident news
Dhule Crime News : आईच्या मृत्यूप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com