Dhule Crime News : आईच्या मृत्यूप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल

Crime News
Crime Newsesakal

Dhule News : वयोवृद्ध आई पुनर्विवाह करणार असल्यामुळे प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार नाही म्हणून आईस मारहाण करीत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलाविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यासंदर्भात शहरातील नटराज चित्रमंदिरासमोर काझी प्लॉट भागातील सरोजनी ऊर्फ सरोज रणजित परदेशी- कांबळे (वय ६६) यांचा पाच जूनला सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला. (case has been registered against son in connection with death of his motherd Dhule Crime News)

यासंदर्भात सरोजनी परदेशी यांची बहिण निवृत्त शिक्षिका सुधा सुकदेव काटकर (वय ८१ रा. कल्याण) यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बहिण सरोजनी परदेशी या पती रणजित परदेशी व मुलगा इनायत रणजित परदेशी (वय ३६) सोबत राहत होते.

सरोजनी परदेशी या पंजाब नॅशनल बँकेत तर रणजित परेदशी हे येवला येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दोघेही पाच वर्षांपासून निवृत्त झाले होते. नंतर ते सत्यशोधक मार्क्सवादी संघटनेचे काम करीत होते.

रणजित परदेशी यांना आजार असल्याने ते बिछान्यावर पडून आहेत. इनायत हा घरीच आई- वडिलांची देखरेख करीत होता. सरोजनी परदेशी या पुनर्विवाह करणार म्हणून इनायत हा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन आईने दुसरा विवाह केल्यास सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार नाही.

या कारणावरून सरोजनी या वयोवृद्ध असून त्यांना मारहाण केल्यास त्यांना मृत्यू येवू शकतो, असे माहीत असताना इनायतने वेळोवेळी आई सरोजनी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस मुलगा इनायत कारणीभूत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Dhule Crime News : जुन्या वादातून नेरची शांतता धोक्यात; 5 गुन्हेगारांना पुण्यातून अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com