टंचाई कृती आराखड्यात 95 गाव-पाड्यांचा समावेश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

साक्री : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तालुक्‍यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे कामही पूर्ण झाले असून, मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील संभाव्य टंचाई लक्षात घेता हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यातील गावांशिवाय अन्य गावांत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास तेथेही तात्कालिक उपाययोजना करण्यात येणार आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्‍यातील 95 गाव- पाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

टंचाई कृती आराखड्यात संभाव्य टंचाई लक्षात घेऊन मार्च, एप्रिल आणि मे अशा पद्धतीने टंचाईग्रस्त गावांची उपाययोजनांसाठी वर्गवारी करण्यात आली आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, विहीर खोल करणे, नवीन विहीर खोदणे, गाळ काढणे, विहीर अधिग्रहीत करणे तसेच तात्पुरती पूरक योजना करणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या कृती आराखड्यानुसार 10 गावांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे, दोन गावांत तात्पुरती पूरक योजना, तर 83 गावांत विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे होणार आहेत. 

मार्च महिन्यासाठी उपाययोजना 
मार्चमधील संभाव्य टंचाई लक्षात घेता फोफरे व आयने येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तर उभंड (व), टेंभे प्र. भामेर, महीर, गंगापूर, तामसवाडी, इच्छापूर, कासारे, सायने, ठेलारीपाडा, निळगव्हाण, पंढरपूर, वेहेरगाव, बुरुडखे, छडवेल (क), विटाई, मापलगाव, बेहेड या गावांत विहीर खोल करणे, गाळ काढणे व विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. कढरे व बळसाणे येथे तात्पुरती पूरक उपाययोजना करण्यात येणार आहे. 

एप्रिलमध्ये उपाययोजना 
एप्रिलमधील संभाव्य टंचाई लक्षात घेता हट्टी बुद्रुक, घाणेगाव येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे, भिलखडी, नागपूर (व), मळखेडा, शेवाळी (दा), मळगाव प्र., सय्यदनगर, सिताडीपाडा, लखाळे, खरगाव, डांगशिरवाडे, गणेशपूर, मोहगाव, डोंगराळे-1, डोंगराळे- 3, उभरांडी, होडदाणे, ऐचाळे, अष्टाणे, सतमाने, देगाव, कुहेर, डोंगरपाडा या गावांत विहीर खोल करणे, गाळ काढणे व विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. 

मेमधील उपाययोजना 
मेमधील संभाव्य टंचाई लक्षात घेता अंबापूर, भामेर, धामनदर, रायटेक, सालटेक, पारगाव या गावांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तर आंबापाडा, आंबादरपाडा, खिरणीपाडा, धाडणे, नवडणे, मालपूर, काकशेवड, मलांजन, दरेगाव, मांजरी, मापलगाव, शिव, खट्याळ, वर्दळी, कालटेक, पचाळे, वासखेडी, छावडी, शिवाजीनगर, मादलीपाडा, मालपाडा, शिवपाडा, पुनाजीपाडा, कोर्डे, पांगण, कोळपाडा, शिरसोले, निरगुडीपाडा, दारखेल, म्हसाळे, म्हसदी प्र. नेर, देवजीपाडा, चिपलीपाडा, गुंजाळपाडा, मावजीपाडा, लहान मावजीपाडा, कड्याळे, नवापाडा, शेवाळी (मा), ककाणी, पाटलीपाडा, बाभूळदे या गावांत विहीर खोल करणे, गाळ काढणे व विहिरी अधिग्रहीत करण्याची उपाययोजना करण्यात येणार आहे.

Web Title: Drought Sakri North Maharashtra Dhule water supply