पावसाच्या सरासरी आकडेवारीवर खुडाणे ग्रामपंचायतीचा आक्षेप.!

jaitane
jaitane

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पावसाबाबतचे फेरसर्वेक्षण करून दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. एका दैनिकातील पावसाच्या सरासरी आकडेवारीचा आधार घेत ही मागणी करण्यात आली आहे. लेटर हेडवरील निवेदनावर सरपंच कल्पनाबाई गवळे यांची स्वाक्षरी आहे.

माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेसह भामेर, खुडाणे, डोमकानी, सालटेक आदी गावांचे फेरसर्वेक्षण करून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आहे. जून व ऑगस्ट महिन्यातील एक-दोन पाऊस वगळता अद्यापही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा असून कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे. रिमझिम पावसामुळे शिल्लक पिकांवर रोगराई पसरत असून पिके धोक्यात आली आहेत. जोरदार पाऊस न झाल्याने विहिरी व कूपनलिका यांच्यासह जमिनीची पाणीपातळीही खालावली आहे. त्यामुळे पिके कोमेजून करपू लागली आहेत. शेतकऱ्यांना भर पावसाळ्यात गाळ काढण्यासह विहिरींचे खोलीकरण करावे लागते आहे. ग्रामपंचायतीचे बोअरवेल व विहिरीही आटल्या असून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

असे असूनही पावसाची आकडेवारी व सर्वेक्षणानुसार ऑगस्ट महिन्यात साक्री तालुक्यात शंभर टक्केपेक्षाही जास्त (191.01 टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. ती पूर्णपणे सदोष असून हा सर्व्हे नेमका कृषी विभागाने केला की अन्य विभागाने? याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून सुधारित अहवाल मागवावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सरपंच प्रतिनिधी पराग माळी, उपसरपंच नामदेव गवळे, माजी सरपंच धनराज गवळे, मोहन ब्राम्हणे आदींनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणासह रस्ता रोको आदी मार्गांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com