येवल्याच्या दुष्काळाचे हे घ्या पुरावे...

येवल्याच्या दुष्काळाचे हे घ्या पुरावे...

येवला - अखेर जे व्हायचे तेच झाले, दुष्काळाची प्रचंड दाहकता असतांना ब्रिटिशकालीन व वर्षानुवर्षे दुष्काळी जाहीर होणारा तालुका चमत्कारिक निकषांमुळे राज्य सरकारने दुष्काळी यादीतून बहिष्कृत केला आहे. आता मंत्री राम शिंदे पाहणी करणार, यंत्रणेने फेर अहवाल पाठवला आहे, मंडळाचा समावेश करणार अशी आवई उठवली जात आहे पण वरातीमागून घोडे दामटून आता तरी यंत्रणा अन सरकार पावणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुष्कळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे वास्तव चित्र आहे. शेतातील पिकांची अक्षरशः वाट लागली व उभी पिके करपली. भर पावसाळ्यात १५ टँकरने ४२ वर गावे-वाडय़ांना पाण्याचे टँकर सुरू होते. खरिपाच्या उत्पन्नात सरासरी ३० ते ५० टक्क्यांपर्यंत घट झाली असे असले तरी यंत्रणेला दुष्काळ दिसत नाही म्हणजे हास्यास्पदच म्हणावे.

शासनाच्या ट्रिगर एकमध्ये येवल्याचे नाव होते. मात्र ट्रिगर दोनमध्ये व अंतिम यादीत नाव गायब झाले. ज्यावेळी सॅटेलाईट सर्व्हे झाला त्यावेळी येवल्यातील बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी, कांदे ही पिके हिरवी दिसल्याने दुष्काळाची गणना झाली नाही असे कारण प्रशासन देत आहे. मात्र मुळातच येवला आवर्षणप्रवण असल्याने येथील शेतकरी कमी पाण्यावर येणारी पिके घेतात.परिणामी टचाईतही ही अनेक पिके हिरवी दिसतात. मात्र या पिकांना फळ लागलेच नाही अन हातात दमडीही पडली नाही. सरतेशेवटी या पिकांचा पालापाचोळा होऊन राखरांगोळी झाली,याचाही सर्व्हे सरकारने करायला हवा होता म्हणजे वास्तव दिसले असते, अशी संतप्त टीका शेतकरी करत आहेत.

तालुका दुष्काळी यादीतून नसूनही येथील बाबा डमाळे सोडले तर सर्वच भाजप नेते याविषयी अज्ञातवासात गेले आहे. खा. हरिचंद्र चव्हान म्हणत होते की नाव येणार आहे पण तेही आता बोलायला तयार नाहीत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, शेतकरी संघटना यांनी आक्रमकपणे बाजू मांडून आंदोलनेही केली पण आजून तरी उपयोग शून्य असल्याचे दिसते. येथील दुष्काळाची आता मंत्री राम शिंदे पाहणी कऱणार आहे, विभागीय आयुक्तांनी अहवाल शासनाकडे पाठविला आहे,मुख्यमंत्री मंडळनिहाय दुष्काळ जाहीर करणार आहे, असे गाजर दाखविले जात आहे पण वराती मागून दडवले जाणारे हे घोडे येवलेकरांना न्याय देणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.

येवल्याच्या दुष्काळासाठी हे घ्या पुरावे
- तीन ते चार आठवडे पावसाचा खंड हवा होता पण तालुक्यात दीड ते दोन महिने पर्यंत पावसाने खंड घेतला असून जुलैत ३१,सप्टेंबरमध्ये १४ तर ऑक्टोबरमध्ये ७ टक्केच सरासरी पाऊस पडला आहे.
- शासनाच्या निकषानुसार जून ते सप्टेंबरदरम्यान ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असावा पण येवल्यात फक्त ६० टक्के पावसाची नोंद आहे.
- वनस्पती निर्देशांक २० ते ४० टक्के हवा होता तो तालुक्यात १० ते २५ टक्क्यांच्यावर दिसलाच नाही.
- ऑगस्ट अखेर ३० टक्के पेक्षा कमी पेरणी हवी होती पण तालुक्यात कपाशी,बाजरीचे क्षेत्र अधिक असल्याने शेतकरी पहिल्या पावसातच जुगार खेळून पेरणी करतात त्यामुळे आकडे अधिक दिसले.
- भूजल पातळीतही तब्बल १.५८ मीटरने घट झाली आहे.
- पावसाळ्यातील चारही महिने तालुक्यात पंधरा टँकरने तर आजही १८ टॅंकरने २९ गावे १९ वाड्याना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 
- कापसाच्या उत्पन्नात यावर्षी एकरी ८,मकाच्या २० ते २२ तर बाजरीत ७ क़्विटलने घट झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com