Latest Marathi News | मद्यपी टँकर चालकाने धुळ्यात चिरडली वाहने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Dhule Accident News : मद्यपी टँकर चालकाने धुळ्यात चिरडली वाहने

धुळे : शहरात शनिवारी (ता. ७) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास एका मद्यपी टँकरचालकाने तीन वाहनांना चिरडत एका जणाला गंभीर, तर अन्य काही जणांना जखमी केले. यात कुणाचाही मृत्यू झालेला नसून नागरिकांनी अफवा पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी केले.

चाळीसगाव चौफुलीवरील शिरूड (ता. धुळे) मार्गे टँकर (जीजे १६ एयू ५१७५) हा शहरात लोकमान्य हॉस्पिटल चौक, प्रकाश टॉकीज, पारोळमार्गे महापालिकेची जुनी इमारत, तेथून जिल्हा रूग्णालय (सिव्हील), संतोषीमाता चौक, फाशीपूलपर्यंत पोहोचला. टँकर चालकाने अती मद्यपान केले होते. (Drunken tanker driver Vehicle crashed into One person is serious Dhule Accident News)

हेही वाचा: Nashik Accident News : कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

त्यामुळे त्याने सिव्हीलजवळ ओमनी, संतोषीमाता चौक परिसरात रिक्षा व स्कूटीला चिरडले. यात रिक्षाचालक विश्‍वजीत यशवंत कारभारी (रा. फाशीपुल, धुळे), ओमनीमधील प्रकाश मौलानी (नंदुरबार) जखमी झाले आहेत. यात मौलानींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना चक्करबर्डीतील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक ह्रषीकेश रेड्डी, शहराचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे व पथकाने धाव घेतली. प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Jalgaon News : सीएसटी- दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार

तोपर्यंत टँकरला रात्री दहानंतर फाशीपुलाजवळ पकडण्यात आले. तेथे नागरिकांनी नशेतील टँकरचालकाला चांगलाच चोप दिला. टँकरचालक शिवचरण काशिनाथ गोते याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बोलण्याचीही शुध्द नसल्याने पुरेशी माहिती पथकाला मिळू शकलेली नाही.

घटनेत कुठलिही जीवीतहानी झाल्याचा वैद्यकीय अहवाल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात घटनेच्या भागात रूग्णवाहिका धावत असल्याने पाच ठार, पंधरा जणांना फरफटत नेले, अशा स्वरूपाची प्राथमिक माहिती चर्चेतून पसरली होती. मात्र, अशा स्वरूपाची अफवा पसरणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

हेही वाचा: Nashik News : 12 वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील चौथा संशयित गजाआड