‘डीएसकें’ची यशोगाथा शिकवायची की नाही?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नाशिक - वाणिज्य शाखा पदवीच्या पहिल्या वर्षीच्या शिक्षणक्रमातील ‘यशोगाथा’ पुस्तकात समाविष्ट असलेल्या ‘वास्तू उद्योगातील अग्रणी डी. एस. कुलकर्णी’ या पाठाचे करायचे काय, असा गंभीर प्रश्‍न प्राध्यापकांपुढे तयार झाला आहे. 

पुस्तकाची पहिली आवृत्ती १५ जून २०१३ ला प्रकाशित केली आहे. पण आता अडीच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप डीएसकेंवर आहे. याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. अशा परिस्थितीत पुस्तकातील त्यांच्यासंदर्भातील पाठ कसा शिकवायचा, असा प्रश्‍न प्राध्यापक उपस्थित करत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वेळच्या वेळी शिक्षणक्रमात बदल होत नसल्याने अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याची खंत प्राध्यापकांची आहे.

निर्णय कुलगुरूंच्या हाती
राज्यातील इतर विद्यापीठांमधील अभ्यासमंडळे अस्तित्वात आली आहेत. मात्र, पुणे विद्यापीठ त्यास अपवाद आहे. त्यामुळे हा पाठ शिकवू नये आणि त्यावर प्रश्‍न विचारले जाऊ नयेत, असा निर्णय कुलगुरू घेऊ शकतात, असे प्राध्यापकांनी म्हटले आहे.

Web Title: DSK success stories in book