मुदतवाढीचा "डीटीई'ला विसर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढत अभियांत्रिकी (बी. ई.), औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म), वास्तूशास्त्र (बी. आर्क) व हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणीला मुदतवाढ दिली.

"एमबीए'च्या अभ्यासक्रमाची कागदपत्रे पडताळणीसाठीची मुदत गुरुवारपर्यंत (ता. 21) असून, त्यास मुदतवाढ देण्याचा विसर "डीटीई'ला पडला आहे. एमबीएला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत असल्याने "प्रोफार्मा एच' उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते आहे.

एमबीए अभ्यासक्रमासाठी दोन ते तीन लाखांपर्यंत प्रति वर्ष इतके शुल्क असते. आरक्षित जागेत प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागणार असून, संपूर्ण शुल्क भरावे लागेल. यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची स्थिती आहे. प्रमाणपत्र सादरीकरणासाठी शिक्षणमंत्र्यांनी मुदत दिलेली असली तरी प्रत्यक्षात एमबीएचा अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यास अर्ज खुल्या गटात ग्राह्य धरला जाईल, असे नोटिफिकेशन प्राप्त होत असल्याने विद्यार्थ्यांची भीती वाढली आहे.

Web Title: DTE education nashik