चालकाच्या प्रसंगावधानाने एसटीचा अपघात टळला

खंडू मोरे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

खामखेडा (नाशिक) : खामखेडा येथील मांगबारी घाटाच्या चढाला एसटीबसचे ब्रेक अचानक निखळल्याचे चालकाने प्रसंगावधानाने प्रवाश्यांना काही समजण्याच्या आत मागील वाहनाचा अंदाज घेत एसटी शंभर ते दीडशे फुट पाठीमागे आणत ६३ प्रवाशांसह एसटीचा मोठा अपघात टाळला. खामखेडा पिंपळदर मार्गावर गुरुवारी (ता. २६) नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

खामखेडा पिंपळदर रस्त्यावरील मांगबारी घाटाच्या चढाला एसटीबसचे ब्रेक अचानक निखळल्याचे एसटी चालक आत्माराम निकम यांच्या लक्षात आले. शंभर ते दीडशे फुट पाठीमागे आणत ६३ प्रवासीचे प्राण वाचवत व एसटीचा मोठा अपघात प्रसंगावधानाने टाळला.

सटाणा आगाराची (एमएच.२०.डी ९०४५) सटाणा विसापुर ही बस ६३ प्रवाशांना घेऊन विसापूरहून सटाण्याकडे परत येत असतांना खामखेडा गावाच्या मांगबारी घाटातील वरच्या टप्प्यावर आल्यावर बसचे अचानक ब्रेक फेल झाले. चालकाच्या हे लक्षात आल्यावर रस्त्याच्या पूर्व बाजूला ऐंशी ते नव्वद फुट खोलगट भाग असल्याने चालकाने मागच्या वाहनाचा अंदाज घेत बस पाठीमागे घेतली. पुढे जाणारी बस अचानक मागे का येते आहे याचा अंदाज घेण्यापूर्वी चालकाने रस्त्याच्या काठाला बस घेत काटेरी बाभळीच्या झाडाला बस टेकवत एसटी बस मधील ४८ प्रवासी १५ विद्यार्थी अशा ६३ प्रवाशांचा प्राण वाचवला.  

बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र, काळजाचा ठोका चुकविणारा हा क्षण प्रवाशांनी गुरुवारी (ता. २६) नऊ वाजता खामखेडा जवळील मांगबारी घाटात अनुभवला.

मांगबारी घाटातून बस पुढे उतारावर नेऊन अनर्थ घडण्यापेक्षा चालकाने प्रसंगावधान राखत याच घाटातील उतारावर रस्त्याच्या पश्चिमेला बस घेत काटेरी बाभळीच्या झाडाला बस थांबवत प्रवाशांचे प्राण वाचवले.

या प्रसंगाने बसमधील प्रवाशांच्या जीवाचा अक्षरश: थरकाप उडाला. बस मागे येत असताना प्रवाशांनी आरडा ओरडा केला. मात्र काही कळण्याअगोदर बस सुरक्षित रस्त्याच्या काठाला झाडाला टेकवत चालकाने प्रसंगावधान दाखवले प्रत्यक्षदर्शींनी एसटीचालक आत्माराम निकम यांचे कौतुक करीत तुमच्यामुळे बसचा मोठा अपघात टळला, व प्रवाशांचे प्राण वाचले असे सांगत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

Web Title: due to drivers bravery avoids st accident