मुक्त विद्यालयांमुळे आता शिक्षणाची दारे सर्वाना खुली 

मुक्त विद्यालयांमुळे आता शिक्षणाची दारे सर्वाना खुली 

लखमापूर (नाशिक) :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 अन्वये मुक्त शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मुक्त शिक्षणाची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मुक्त शिक्षण मंडळाची स्थापना करून मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर मुक्त विद्यालय स्थापन करण्यात आली आहेत. औपचारिक शिक्षणापासून वंचित घटकांना या विद्यालायमुळे शिक्षणाची दारे उघडी झाली. अशी माहिती नासिक जिल्हा मुख्यध्यापक संघाचे अध्यक्ष के के अहिरे यांनी दिली. 

समाजातील प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. समाजातील अनेक मूल काही कारणाने शिक्षणापासून वंचित राहतात, दारिद्र्य, आर्थिक दृष्ट्या मागसलेपन, दिव्यांगता, इ कारणाने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. शिक्षणच होत नाही अश्या मुलांसाठी मुक्त विद्यालय ही शासनाची खरोखर चांगली योजना आहे. ज्यांना शिक्षण घेणे जमले नाही ते या विद्यालयातून शिकू शकतात व आपल्या पायावर उभे राहू शकतात. राज्यात गळतीचे प्रमाण यासारख्या करणांनीच जास्त आढळत असल्याने गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा ही या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ बहिस्थ विद्यार्थी योजना वापरते. मात्र या विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थ्यासारखा अभ्यासक्रम असल्याने ते विषय देणे कठीण जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्याला हा पर्याय नक्कीच चांगला आहे. ज्यामुळे विध्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवड करता येते. सोपा अभ्यासक्रम निवड करून राज्य मंडळ समकक्ष परीक्षा उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र मिळवता येईल.

मुक्त विद्यालयाची उद्दिष्टे
समांतर व पूरक शिक्षण, गळतीचे प्रमाण कमी करणे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गृहिणी, व्यक्ती, मजूर, कामगार, दिव्यांग इ शिक्षणाची संधी उपलब्द करून देणे. व्यासायासाठी उपयुक्त अभ्यासक्रम इ महत्वाची उद्दिष्टे असून या विद्यालयाची विशिष्टेखालील प्रमाणे आहेत. आपल्या सोयीनुसार अध्ययन, अभ्यासक्रम लवचिकता, व्यवसाय उपयुक्त अभ्यासक्रम, सर्वांसाठी शिक्षण ,दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष अभ्यासक्रम अशी आहेत.

पात्रता:- 
इ ५ वि साठी व ८ वी साठी :- ५ वी १० वर्ष तर ८ वी साठी १३ वर्ष वय पूर्ण असावे कमाल वयाची अट नाही. पूर्वी औपचारिक शिक्षण घेतले नसेल तर, दाखला नसेल तर स्वयं घोषित प्रतिज्ञापत्र असेल तरी चालेल, शालांत परीक्षा १० वी साठी १५ वर्ष वय पूर्ण असणे अपेक्षित आहे. मात्र किमान ५ वी इ उत्तीर्ण असणे बांधकारक आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

नोंदणी:-
ऑनलाइन पद्धतीने करून प्रिंट काढून संपर्क केंद्रावर जमा करणे अपेक्षित आहे परिक्षेपूर्वी ६ महिने नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी शुल्क १००० रु असून ९ परीक्षा ना संधी दिली जाईल नाशिक जिल्ह्यात अशी १७ संपर्क  केंद्रांना मंडळाने मान्यता दिली असून प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे मुक्त विद्यालये सुरू केली आहेत. 

जिल्हातील १७ शाळेची नावे अशी 
1) दिंडोरी लखमापूर, कादवा इंग्लिश स्कूल. 2) चांदवड, उशा राजे होळकर. 3) देवळा, रामराम आदिक निंबोळे. 4) इगतपुरी जनता विद्यालय इगतपुरी. 5) कळवण RKM कळवण. 6) मालेगाव सावित्रीबाई फुले कुकाने व एटीटी हायस्कुल मालेगाव. 7) नासिक, छत्रपती विद्यालय शिंदे व रमाबाई आंबेडकर विद्यालय नासिक. 8) निफाड वैनतेय विद्यालय, 9) नांदगाव न्यू इंग्लिश स्कूल 10) पेठ. जनता विद्यालय, 11)सुरगाणा नूतन विद्यामंदिर. 12) सटाणा, जिजामाता कन्या विद्यालय. 13)सिन्नर, महात्मा फुले विद्यालय, 14) त्र्यम्बक MRPH कन्या त्र्यंबकेश्वर. 15)  येवला, इंझोकेम विद्यालय अशी 17 संपरकेंद्र निश्चित करण्यात आली आहेत अशी माहिती प्राचार्य के के अहिरे यांनी दिली

अधिक माहितीसाठी मुक्त शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर मिळेल Http://manos.mh-ssc.ac.in किंवा  www.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर माहिती मिळेल.

परीक्षेसाठी फक्त 5 विषय असून 3 भाषा अनिवार्य आहेत तर भाषेतर 23 विषयातून 3 विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण वायहचे असल्याने शिक्षण न घेता आलेल्या सर्वांसाठी मुक्त विद्यालये खरोखरच एक संधी चालून आली आहे
चला तर मग सारेच शिकू या 
- प्राचार्य. के के अहिरे., अध्यक्ष ,जिल्हा मुख्याध्यापक संघ नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com