प्रेम करून लग्न केलय...आंतरजातीय असलो म्हणून जीव घेणार का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

वाडीवऱ्हे येथील भरत मुर्तडक (वय 30) याने गावातील सोनाली (वय 24) हिच्यासोबत मार्च 2018 मध्ये आंतरजातीय विवाह केला. यानंतर वर्षभर दोघांनी उत्तम संसार केला. मात्र हा विवाह आंतरजातीय असल्याने संबंधितांनी दबाव आणि धाक दाखवून भरत मुर्तडक याला संपवून टाकू, असे सांगितल्याने ती दहशतीखाली वावरत आहे. 

नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणाला ठार करण्याच्या धमक्‍या दिल्या जात आहेत. याबाबत सर्वत्र तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने त्याला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. तातडीने न्याय द्यावा, अशी तक्रार भरत प्रभाकर मुर्तडक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. वाडीवऱ्हे येथील भरत मुर्तडक (वय 30) याने गावातील सोनाली (वय 24) हिच्यासोबत मार्च 2018 मध्ये आंतरजातीय विवाह केला. यानंतर वर्षभर दोघांनी उत्तम संसार केला. मात्र हा विवाह आंतरजातीय असल्याने संबंधितांनी जुलै 2019 मध्ये नोकरीनिमित्त घराबाहेर पडलेल्या सोनालीला गाठून तिला बळजबरीने स्वतःच्या घरी नेले. दबाव आणि धाक दाखवून भरत मुर्तडक याला संपवून टाकू, असे सांगितल्याने ती दहशतीखाली वावरत आहे. 

हेही वाचा > लाखमोलाचा "त्यांचा' जीव यामुळे वाचला...

आंतरजातीय विवाह करणाऱ्या वाडीवऱ्हेच्या युवकाला धमक्‍या 

नोंदणीकृत पद्धतीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे राग येऊन भरत मुर्तडक याला रोज गुंडगिरीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, वाडीवऱ्हेचे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. भरत मुर्तडक घोटी येथील एका बॅंकेत नोकरीला असून, त्यानिमित्त रोज प्रवास करताना दहशतीचा सामना करावा लागतो, असे निवेदनात म्हटले आहे. त्नी सोनाली हिला सक्षम अधिकाऱ्यांपुढे हजर करून तिची भूमिका समजून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करावी, योग्य ते पोलिस संरक्षण देऊन न्याय द्यावा, अशी मागणी मुर्तडकने निवेदनात केली आहे. 

हेही वाचा > अभयारण्यात कोण करतयं वटवट...'हा' तर नाही?

....नाहीतर 'सैराट'ची पुनरावृत्ती पुन्हा होईल..
पत्नी दहशतीत असल्याने तिची खरी भूमिका यंत्रणेने समजून घ्यावी. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाने माझ्या मागणीवर सकारात्मक विचार करणे अत्यंत आवश्‍यक आहे. - भरत मुर्तडक, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to Interracial marriage parents are angry on couple Nashik Marathi News