भाजीपाल्याच्या दरांची सेंच्युरी..कळले का दर?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसानंतर अवकाळीच्या माऱ्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे बाजारात फळे आणि पालेभाज्यांची आवक घटली आहे. दर गगनाला भिडल्याने महिलांचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे.

नाशिक :  जिल्हाभरात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झालेले आहे. रोजच्या जेवणातील भाज्यांच्या किमती गगनाला भिडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कोथिंबिरीची जुडी शंभर रुपये, तर गवारीसह अन्य काही भाज्यांचे भाव शंभर रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले आहेत. वाटाण्याचे दर 160 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. आणखी काही दिवस दरांमध्ये अशीच तेजी राहणार असल्याचे विक्रेते सांगत आहेत.  परतीच्या पावसानंतर अवकाळीच्या माऱ्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे बाजारात फळे आणि पालेभाज्यांची आवक घटली आहे. दर गगनाला भिडल्याने महिलांचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे. 

कोथिंबीर, गवार शंभर रुपये, वाटाण्याचे दर प्रतिकिलो 160 रुपये 

नाशिक : अवकाळी पावसामुळे पिकांबरोबरच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शहरात येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. फळभाज्या, पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी आवक झाल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातही भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात कोथिंबीर एक जुडी शंभर रुपयांने विक्री केली जात आहे. इतर पालेभाज्यांचे भावदेखील दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. सर्वसामान्यांच्या ताटातील गवार शंभर रुपये किलोने विक्री केली जात आहे. पावभाजीमधला वाटाणा दीडशे रुपये किलोने, तर चायनीज गाजर 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे.

असे आहेत दर (किलोमागे)
वांगे 50 रुपये 
भेंडी 50 रुपये 
टोमॅटो 40 रुपये 
कारले 60 रुपये 
गिलके 50 रुपये 
शिमला 40 रुपये 
घेवडा 40 रुपये 
कोबी 20 रुपये 
फ्लॉवर 20 रुपये 
मिरची 40 रुपये 
लसूण 200 रुपये 
काकडी 30 रुपये 

प्रतिक्रिया
पावसामुळे खरीप हंगामातील पिकांबरोबरच काढणीला आलेली पिके वाहून गेल्याने आवक घटली आहे. मात्र दर वाढल्याने ग्राहकांकडून भाजीपाला खरेदीला प्रतिसाद कमी मिळतो आहे. ग्राहकांकडून नेहमीपेक्षा कमी भाजीपाला खरेदी केला जातो आहे. - खंडू धोंडगे, विक्रेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to rain Vegetables rates increased at Nashik