Nandurbar News : यात्रेत भाव खातोय पन्नालाल! देतोय प्रश्नांची उत्तरे....

Pannalal answering the questions asked by the owner during the yatra.
Pannalal answering the questions asked by the owner during the yatra. esakal

Nandurbar News : मालकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत बरोबर उत्तराचा जागेवर जाऊन उभा राहणारा चार पायाच्या पन्नालाल तळोद्यातील यात्रेत भाव खात असून त्याचे उत्तर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. (during yatra donkey named Pannalal answers owner questions nandurbar news)

त्यामुळे यात्रेकरूंचे मनोरंजनही होत असल्याने पन्नालाल येथील यात्रेत एक कुतूहलाचा विषय बनला आहे. गाढव असे म्हटल्यानंतर उपहासात्मक व ओंगळवाणे वाटणारा प्राणी आपल्या नजरेत येतो.

चुकीची कामे करणाऱ्यास देखील हा शब्द वापरण्याची एक पद्धत आहे. मात्र येथील यात्रेत अमरावती येथून आलेला पन्नालाल नामक गाढव चक्क मालकाच्या प्रश्नांची उत्तरे देत असल्याने कुतूहलाचा विषय बनला आहे.

त्या पन्नालालचे मालक खलिल अहमद खान यांनी प्रश्न सांगताच पन्नालाल गर्दीत त्या माणसाला ओळखतो व त्याच्याजवळ जाऊन उभा राहतो. त्या प्रश्नांमध्ये येथे आलेल्यांमध्ये सर्वात कंजूस कोण, पती पत्नी ओळखणे, आई वडील ओळखणे, कोणाचा वकिली व्यवसाय आहे, कोण डॉक्टर आहे, येथे आलेल्यात कोणी अंघोळ केली नाही, बायकोला मस्का कोण जास्त लावते, तर कोण अधिक प्रामाणिकपणे काम करते अशी विविधरंगी प्रश्नांची उत्तरे पन्नालाल देत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Pannalal answering the questions asked by the owner during the yatra.
Sakal Exclusive : गुळनिर्मितीतून आदिवासी शेतकरी आत्मनिर्भर; महुबंदला दोन गुऱ्हाळ

त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन देखील होत आहे. दरम्यान खलिल अहमद खान हे आपल्या पन्नालालला घेऊन पहिल्यांदाच येथील यात्रेत आले आहेत. पन्नालालला तेलगू, गुजराती, हिंदी, मराठी व इंग्रजी भाषा कळत असल्याचे त्यांनी सांगितले.

पन्नालालला प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे १८ ते २० महिने लागले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान यात्रेत पन्नालाल पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

"पन्नालालमुळे आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. तो एक हुशार जीव असून आमच्याकडे वीस वर्षांहून अधिक काळापासून पन्नालाल आहे. त्याला घेऊन तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात जात असतो. वर्षभर यात्रेत फिरून चरितार्थ सुरू आहे." -खलिल अहमद खान, पन्नालालचे मालक

Pannalal answering the questions asked by the owner during the yatra.
Dhule Water Shortage : ऑगस्टपर्यंत 270 गावांना पाणीटंचाई; ‘अल निनो’मुळे दुष्काळाची भीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com