पोपटराव सोनवणे राष्ट्रवादीत?

Popatrao Sonwane may join NCP
Popatrao Sonwane may join NCP

साक्री ः साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, दुसाणे (ता. साक्री) गटातील अपक्ष नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यामुळे श्री. सोनवणे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांना ऊत आला.

याबाबत थेट श्री. सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगत पक्ष प्रवेशाबाबत मात्र मौन पाळले. दरम्यान, या भेटीत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यतता व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी तालुक्यालतून कॉंग्रेस पक्षातून सर्वप्रथम श्री. सोनवणे यांनी बाहेर पडत भाजपची वाट धरली होती. विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी शिकस्त केली. यानंतर जिल्हा परिषदेच्या दुसाणे गटातून ते भाजपतर्फे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी त्यांना बाजूला करत दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली.

यामुळे प्रचंड नाराज झालेल्या श्री. सोनवणे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरत नारायण पाटील यांना पराभूत करत विजयश्री खेचून आणली. एवढेच नव्हे, तर दुसाणे गटातील हट्टी गणातून त्यांनी भूषण बागले यांनाही निवडून आणले.

भाजप नेत्यांवर प्रचंड नाराज

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले पोपटराव सोनवणे आता पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत, अशीच चर्चा तालुक्याात रंगत होती.

यात आज त्यांनी अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यरता निर्माण झाली आहे. मात्र, श्री. सोनवणे यांनी प्रवेशाबाबत मौन पाळत आजची भेट सदिच्छा भेट असून, या भेटीत राज्य बाजार संघ व बाजार समितीच्या विविध अडचणींसंदर्भात श्री. पवार यांच्याशी चर्चा केल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com