खोट्या सह्या केल्या आणि केले ट्रान्सफर १८ लाख.. 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

नेहा म्हैसपूरकर यांनी त्यांच्या अंबड एमआयडीसीतील विजया कन्व्हर्टर कंपनीच्या कार्यालयातील एका कप्प्यात बॅंक ऑफ महाराष्ट्रचे चेकबुक ठेवले होते. या चेकबुकची अज्ञाताने चोरी करून त्यातील विविध क्रमांकाच्या चेकवर फिर्यादीच्या खोट्या सह्या केल्या. आणि पैसे परस्पर त्याच्या खात्यात वळविले.

नाशिक : अंबड औद्योगिक क्षेत्रातील विजया कन्व्हर्टर कंपनीच्या कार्यालयातून अज्ञाताने बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या चेकबुकची चोरी केली व दोन चेकवर खोट्या सह्या करून दोन वेगवेगळ्या खात्यांवर सुमारे 18 लाख 13 हजार रुपये परस्पररीत्या वळवले. फिर्यादी नेहा सुधीर म्हैसपूरकर यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहा सुधीर म्हैसपूरकर यांनी त्यांच्या अंबड एमआयडीसीतील विजया कन्व्हर्टर कंपनीच्या कार्यालयातील एका कप्प्यात बॅंक ऑफ महाराष्ट्रचे चेकबुक ठेवले होते. या चेकबुकची अज्ञाताने चोरी करून त्यातील 251924 व 261924 क्रमांकाच्या चेकवर फिर्यादीच्या खोट्या सह्या केल्या. आरटीजीएस फॉर्मवर कंपनीचा शिक्का मारून बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अंबड शाखेतील कंपनीच्या 60123605807 क्रमांकाच्या चालू खात्यावरून दोन लाख 64 हजार 556 रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे स्वरा ट्रेड सोल्यूशन नावाने आयडीबीआय बॅंकेच्या निगडी शाखेतील खात्यावर ट्रान्सफर केली. कोटक बॅंकेच्या सुरेंद्रनगर शाखेतील खात्यावर 15 लाख 49 हजार 326 रुपये ट्रान्सफर करून फिर्यादी नेहा म्हैसपूरकर यांची एकूण 18 लाख 13 हजार 882 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eighteen lakhs were transferred with false signature