एकोपा जपत ९१ गावांची ‘एक गाव एक गणपती’ला साद

एकोपा जपत ९१ गावांची ‘एक गाव एक गणपती’ला साद

येवला - गटबाजी थांबली की वाद टळतात..यासाठी गट-तटाचे निमीत्तच राहू नये व गावाने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा या पोलिसांच्या आवाहनाला साद देत तब्बल ९१ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना अमलात आणली आहे. विशेष म्हणजे ही सामाजिक बांधिलकी जपणारे जिल्ह्यात सर्वाधीक गावे येथील आहे.

तंटेमुक्त होऊन गावात उत्सवात तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना गेल्या ८-१० वर्षापासून अधिक बळ धरत आहेत. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी गेल्या वर्षापासून यावर अधिक भर दिल्याने ही संकल्पना चांगलेच मूळ धरत गावागावात एकोपा निर्माण करण्याचे कामाला चांगलीच गती मिळाली आहे.विशेष म्हणजे उणे-दुणे व मंडळातील स्पर्धा देऊ ठेवत ग्रामस्थांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे. तालुक्यात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक निरीक्षक नरेंद्र खैरनार आदींनी गावोगावी ग्रामस्थांच्या बैठका घेऊन नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तब्बल ७२ गावांनी प्रतिसाद दिला आहे. तर शहर हद्दीत पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे, चंद्रकात निर्मळ व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येऊन १९ गावांनी सहभाग घेतला आहे.

विशेष म्हणजे पाटोदा, सायगाव, राजापूर सारखी सर्वाधिक लोकसंख्येची गावे देखील सलग दुसऱ्या वर्षी एकोप्याने सहभागी होत आहे.तर शहर हद्दीतील नांदेसर,पिंपळगाव जलाल,कोटमगाव खुर्द या गावांनी अनेक वर्षापासून साद घालत बक्षिसांवर देखील मोहोर उमटवली आहे. आता ज्या गावांमध्ये एकच गणपती आहे अश्या गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण, आरोग्य अशा विविध विषयांची जनजागृती होत आहे. बालभोजन, कीर्तनाचे कार्यक्रम व विविध स्पर्धाचे आयोजन होत आहेत. इतर खर्चाला फाटा देत गावभोजनावर केला जात आहे.

“एक गणपतीच्या गावांना प्रमाणपत्र देऊन गौरवले जाणार आहे तसेच विघ्नहर्ता बक्षीस योजनेद्वारे सामाजिक बांधिलकीचे देखावे, सामाजिक उपक्रम राबविनाऱ्या गावांना परीक्षण करून बक्षीस दिले जातील. ग्रामस्थांत यामुळे एकोपा व सामाजिकता टिकून जिव्हाळा, आपुलकीची भावना निर्माण होत आहे.”
-बाळासाहेब भापकर,पोलीस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com