नगरपरिषदाच्या प्रभाग रचना कार्यक्रमाला निवडणूक आयोगाकडुन स्थगिती

bhadgaon nagar parishad
bhadgaon nagar parishad

भडगाव : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्षाचा निर्णय रद्द करून नगरसेवकांमधुनच नगराध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यापाश्वभुमिवर भडगाव नगरपरिषदेसह राज्यातील आठ नगरपरिषदेचा वार्ड रचना, आरक्षणांचा कार्यक्रमाला निवडणूक आयोगाकडुन स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भडगाव नगरपरिषदेची निवडणूक पुढे लांबण्याची शक्यता आहे. तर या निर्णयामुळे एक सदस्यीय प्रभाग व नगरसेवकांमधुन नगरध्यक्ष होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 
भडगाव नगरपरिषदेसह राज्यातील आठ नगरपरिषदेचा प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडुन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार दोन सदस्यसीय प्रभाग रचना ही पालिका प्रशासनाकडुन पुर्ण करण्यात आली होती. मात्र आता या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाकडुन स्थगिती देण्यात आली आहे. तसे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडुन त्या त्या जिल्हाधीकार्याना प्राप्त झाले आहे. 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्षाचा निर्णय रद्द करत नगरसेवकांमधुनच नगरध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. तर यापुर्वीच एक सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय झाला आहे. त्यापाश्वभुमिवर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील आठ पालिकाच्या प्रभाग रचना, आरक्षणांच्या कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत याच्या स्वाक्षरीने पत्र प्राप्त झाले  आहे.  

8 पालिकेचा कार्यक्रमाला स्थगिती
राज्यातील भडगाव, वरणगाव, अंबरनाथ, बदलापुर-कुळगाव, भोकर, मोवाड, वाडी, राजगुरूनगर या नरगपरीषदाचा प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार प्रभागाचा प्रारूप तयार करण्यात आला होता. तर उद्या आरक्षणांबाबत नोटीस बजावण्यात येणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे साधारणपणे एप्रिलमध्ये होणार्या निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांमधुनच होणार नगराध्यक्ष 
भडगाव नगरपरिषदे लोकनियुक्त पध्दतीने लोकनियुक्त निर्णय होईल असे वाटत होते. मात्र कालच्या मंत्री मंडळाच्या निर्णयाच्या पाश्वभुमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेला स्थगितीत दिल्याने आता नगरसेवकांमधुनच नगरध्यक्ष निवडला जाण्याचे निश्चित झाले आहे. तर प्रभाग ही दोन सदस्याऐवजी एक सदस्यीय होईल. त्यामुळे लोकनियुक्त नगरध्यक्षपदासाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

प्रभाग रचनेसह,प्रभागाचे आरक्षण कार्यक्रमाच्या स्थिगीतीचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-विकास नवाळे मुख्याधिकारी नगरपरिषद भडगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com