शहरातील मालमत्ताधरकांनी भरला अकरा कोटीचा कर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे व हजाराची नोट चलनातून बंद केल्याने जळगाव महापालिकेची तिजोरी मालामाल झाली. तेरा दिवसात जळगाव शहरातील तीन हजार मालमत्ता धारकांनी 11 कोटीचा कर जुन्या नोटांद्वारे भरला आहे.

अत्यावश्‍यक सेवा व शासकीय वसुलीसाठी जुन्या स्वीकारण्याची मुभा दिली होती. त्यानुसार 12 नोव्हेंबर पर्यंत रात्री बारा पर्यंत कार्यालय उघडे ठेवून मनपाने कर वसुली झाली. त्यानंतर 24 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढवुन देण्यात आली. तेरा दिवसात जळगाव शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून मालमत्ता करापोटी 11 कोटी 21 लाख रुपये भरले आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीला बरे दिवस आले आहेत.

Web Title: Eleven crore tax paid in property

टॅग्स