Dhule News : धुळ्यात ग स बँकेतच कर्मचाऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogesh nikam

Dhule News : धुळ्यात ग स बँकेतच कर्मचाऱ्याची आत्महत्या

धुळे : शहरातील सरकारी नोकरांची सहकारी बँकेतील शिपायाने बँकेच्या जिन्यातच गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळी उघडकीस आली. (employee commits suicide in Bank dhule news gbp00)

आत्महत्येचे कारण समजले नाही. मात्र, त्यांच्यावर बँकेचे दहा लाखांचे कर्ज असल्याने बँकेने नोटीसा बजावल्या होत्या. त्यास वैतागून शिपायाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

योगेश सुकलाल निकम (वय ४५, रा. एकतानगर, देवपूर, धुळे) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे. ग. स. बँकेचे कार्यलय बुधवारी सुटीमुळे बंद होते. शिपाई योगेश निकम यांची ड्युटी होती.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

दरम्यान त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांवरील मजल्याच्या ग्रीलला नळीच्या सहाय्याने गळफास घेतला. बँकेचे शाखाधिकारी प्रशांत बोरसे सायंकाळी साडेचारला कामासाठी बँकेत आले असता त्यांना ही बाब लक्षात आली.

याबाबत त्यांनी बँकेचे कार्यकारी संचालक संजय देसले यांच्यासह शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. नंतर बँकेचे व्यवस्थापक भारत भामरे, लेखा व्यवस्थापक राजेंद्र पाटील घटनास्थळी दाखल झाले. तसेच शहर पोलिस ठाण्याचे कैलास दामोदर व कर्मचारीही दाखल झाले.

टॅग्स :DhuleDhule Suicide Case