Nandurbar News : नागरिकांनी स्वतःहून काढले अतिक्रमण; अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेताच निर्णय

encroachment was removed by citizens themselves nandurbar news
encroachment was removed by citizens themselves nandurbar newsesakal

Nandurbar News : पालिका प्रशासनाने आवाहन करूनही सुस्त असलेल्या अतिक्रमणधारकांना अखेर पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी गुरुवारी (ता. २८) थेट स्वतः मैदानात उतरून अतिक्रमणावर हातोडा मारला.

त्यात शंभरावर अतिक्रमणे काढण्यात आली. ती धास्ती घेत शुक्रवारी नागरिकांनी आपले अतिक्रमणे स्वतःहून काढून घेत नुकसान टाळले. (encroachment was removed by citizens themselves nandurbar news)

शहरात मुख्य रस्त्यांवर मनमानीपणे वाटेल तेथे अतिक्रमण करून व्यवसाय थाटण्यात आले होते. जणू काय स्वमालकीची जागा असल्याचा आव आणून बिनधास्त अतिक्रमण केले जात होते. अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र स्थानिक राजकारण लक्षात घेऊन ते काढण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.

यापूर्वीचे मुख्याधिकारीही या विषयाकडे पाहत नव्हते, एवढेच काय मात्र काही राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवरही पत्र्याची दुकाने तयार करून अतिक्रमण केले होते.

त्याही पुढे जाऊन चक्क जगतापवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका समाजाच्या स्मशानभूमीवरच अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालविला होता. एकाने दुकान बांधले तर रात्रीतून तेथे दहा दुकाने तयार झाली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

encroachment was removed by citizens themselves nandurbar news
Dhule News : धुळे मनपाला राज्यात पाचवे, विभागात प्रथम मानांकन; पदाधिकाऱ्यांकडून कौतुक

तेही एखादा गरीब हातगाडी लावून पोटासाठी व्यवसाय करणारा नागरिक नव्हे तर धनदांडग्यांनी ते अतिक्रमण करून थेट दुकाने भाडेतत्त्वावर देऊन आर्थिक लाभ घेत असल्याचे बोलले जात होते. अशीच परिस्थिती शहरातील अनेक भागांत आहे. हे लक्षात घेऊन नव्यानेच प्रशासक म्हणून रुजू झालेले पुलकित सिंह यांनी अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते.

मात्र नागरिकांनी काढले नाही. म्हणून त्यांनी गुरुवारी जेसीबीच्या सहाय्याने मोहीम राबविली. स्वतः मोहिमेत सहभागी होत कोणाचाही मुलाहिजा न बाळगता अतिक्रमणे काढली. शुक्रवारी त्याची धास्ती घेत नागरिकांनी स्वतःच आपापली अतिक्रमणे व टपऱ्या, हातगाड्या काढून घेतल्या.

अव्याढव्य गतिरोधक काढले

दरम्यान, अतिक्रमणासोबतच मुख्य रस्त्यांवर तांत्रिक बाबींचा विचार न करता वाटेल तेथे अवाढव्य गतिरोधक यापूर्वी टाकण्यात आले होते. त्या गतिरोधकांमुळे अनेकदा लहान वाहने घसरून वाहनचालक जायबंदी होत होते. अनेकांना कंबरेचे व मानेचे, पाठीचे विकार जडले आहेत. हे लक्षात घेऊन अवाढव्य गतिरोधकही शुक्रवारी पालिकेने काढले.

encroachment was removed by citizens themselves nandurbar news
ZP Cleanliness Drive : जिल्हा परिषद राबविणार गोदावरी स्वच्छता मोहीम; लोकसहभागातून करणार स्वच्छता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com