Dhule News : अभियंता तरुणीची तापी नदीत आत्महत्या

Death News
Death Newsesakal
Updated on

Dhule News : येथील नंदिनी रवींद्र खैरनार (धोबी, वय २४, ह.मु. साईदर्शन कॉलनी, नकाणे रोड, देवपूर, धुळे) हिने गुरुवारी (ता. १७) दुपारी बाराच्या सुमारास दभाशीजवळ तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. (Engineer girl commits suicide in Tapi river dhule news)

तिला उडी मारताना काही मासेमारी करणाऱ्यांनी पाहिले. त्यांनी तिला बाहेर काढले. मात्र ती मृत झाली होती. तिचे छायाचित्र व्हॉट्सॲपवर टाकण्यात आल्यानंतर पानसेमल (मध्य प्रदेश) येथील मामाने तिचे छायाचित्र पाहिले. तेव्हा नंदिनीबाबत उलगडा झाला. माहिती मिळताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.

नंदिनीने नुकतीच सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळविली होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वडील रवींद्र सुकदेव खैरनार लॉन्ड्री व्यवसाय करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Dhule Crime : दप्तरात फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक

गरिबी असूनही मोठ्या मेहनतीने तिला सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. गेल्या महिन्यापासून ती नाशिकला प्रशिक्षण घेत होती. नुकतीच ती परत आली होती.

मैत्रिणीकडे जाते, असे सांगून व मोबाईल घरी टाकून ती सकाळी बाहेर गेली. ती कुठे गेली म्हणून घरात विचारपूस सुरू असतानाच तिच्या मृत्यूचा निरोप आला. ती प्रेम खैरनार यांची बहीण आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे.

Death News
Dhule Crime : धुळ्यात ‘मिरची पूड’ गँग गजाआड; 10 हजारांच्या बक्षिसातून कौतुकाची थाप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com