अभियंता गुणवंत सोनवणे यांनी वाटली विद्यार्थ्यांना पुस्तके 

mehunbare
mehunbare

मेहुणबारे : शिक्षणावर होणारा खर्च सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नाही. त्यामुळे बहुतेक मुलांचे पैशाअभावी शिक्षण थांबते.मात्र शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करत असलेले कळमडु (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी सध्या पुण्यात संगणकीय अभियंता असलेल्या गुणवंत सोनवणे यांनी आपल्या दातृत्वातुन मेहुणबारे येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप केली.

मेहुणबारे येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये पहीली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत. येथील शाळेतील मुलांना पुस्तके आद्यापही मिळाली नव्हती त्यांच्या शाळेला लागणारी पुस्तके मिळविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शाळेचे मुख्याध्यापक एन.एस.शेटे हे जळगाव येथे देखील जाऊन आली, परंतु ती पुस्तके तेथेही उपलब्ध नव्हती. त्यांनी शिक्षण विभागाकडे देखील पुस्तकांची मागणी केली होती मात्र तेथेही उपलब्ध नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत होती.

अशावेळी कळमडु गावाचे सुपुत्र जे सध्या पुण्याला संगणकीय अभियंता आहेत. त्यांनी येथील शाळेवर असलेली पुस्तकांची समस्या लक्षात घेऊन पुण्यातच पुस्तक डेपोवर जाऊन पहिलीचे मजेत शिकुया मराठी, दुसरीचे मजेत शिकुया मराठी, तिसरीचे सुलभ बालभारती हिंदी या विषयाची पुस्तके त्यांनी घेतली त्यानंतर थेट पुण्यावरून मेहुणबारे येथील जिजाऊ शाळेत पाठवुन दिली. त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद 
येथील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाल्याने मुलांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. पुस्तक वाटप प्रसंगी मुख्याध्यापक एन.एस.शेटे, शिक्षीका रामेश्वरी कच्छवा, अंकिता पाटील, तनुजा वाघ, रूपाली पाटील, अनिता गढरी, बारकु पाटील, राजेंद्र साळुंके व सर्वज्ञ एज्युकेशन नवी मुंबई यांनी सोनवणे यांचे आभार मानले.

शिक्षण क्षेत्राबद्ल सोनवणे यांची असलेली आस्था,व प्रेम, ओढ, लक्षात ठेवुन त्यांनी ध्येपूर्तीसाठी आमच्या विद्यालयात विनामूल्य पुस्तके दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही खुप खुप आभारी असुन त्यांची ही सेवा पाहुन आम्ही सर्व भारावून गेलो आहोत.
- एन.एस.शेटे, प्राचार्य जिजाऊ इंग्लिश स्कूल मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com