प्रत्येक घरातून अभियांत्रिकी निर्माण व्हावा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

अक्कलकुवाः जीवन जगत असताना आपण कोणत्या दिशेकडे प्रवास करीत आहोत, याकडे प्रथम लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच आपले भविष्य निश्चित होईल. प्रगतीसाठी प्रत्येकाला स्पर्धेच्या युगात धावपळ करावी लागणार आहे. आज टेक्नॉलॉजीच्या युगात प्रत्येक घरातून अभियांत्रिकी निर्माण झाला पाहिजे, असे आवाहन जामिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मौलवी गुलाम वस्तानवी यांनी केले.

अक्कलकुवाः जीवन जगत असताना आपण कोणत्या दिशेकडे प्रवास करीत आहोत, याकडे प्रथम लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच आपले भविष्य निश्चित होईल. प्रगतीसाठी प्रत्येकाला स्पर्धेच्या युगात धावपळ करावी लागणार आहे. आज टेक्नॉलॉजीच्या युगात प्रत्येक घरातून अभियांत्रिकी निर्माण झाला पाहिजे, असे आवाहन जामिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मौलवी गुलाम वस्तानवी यांनी केले.

जामिया शिक्षण संस्थेत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘टेक्निकल फेस्ट कनेक्ट- २०२०’च्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रम जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शहादा येथील निषाद कनिष्ठ महाविद्यालयाचे आसिफ अन्सारी, जामिया अस्सलाम हॉस्पिटलचे कार्यवाहक हाफिझ सुलेमान रंदेरा, जामिया फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाविद खान, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रफिक जहांगिरदार, उपप्राचार्य इम्रान अली, अल्लाना इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मुश्ताक शेख, जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयातील उपप्राचार्य इरफान सय्यद, मोईन शेख आदी उपस्थित होते. स्पर्धेत देशभरातील सुमारे सात हजार ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

मंदीवर मात, रोजगारनिर्मितीसाठी हवेत ठोस उपाय

श्री. वस्तानवी म्हणाले, की सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ‘जामिया’चे नाव शिक्षण क्षेत्रात देशातच नव्हे; तर जगाच्या प्रगतीच्या पटलावर आदराने घेतले जाते, म्हणून देशातील प्रत्येक घरात जन्माला आलेले एक मूल तरी भविष्यात अभियांत्रिकी व्हावा, ही आमची मनस्वी इच्छा आहे. ग्रामीण भागात शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा बदलावा, या उद्देशाने जामिया शिक्षण संस्था विविध उपक्रम राबवीत असते. या ठिकाणी अभियंता झालेल्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.

जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतातून ५० पेक्षा अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी सुमारे सात हजार पाचशे विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. या स्पर्धेत २२ विषयांवर स्पर्धा झाली. जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयातील उपप्राचार्य इरफान सय्यद यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बिलाल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बिलाल पटेल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. सय्यद नूर, प्रा. जुनेद काझी, प्रा. सय्यद इम्तियाज, प्रा. शेख मजीद, प्रा. अक्रम मन्सुरी आदींनी सहकार्य केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineer should be created from every home, says Wastanavi