चाळीसगाव तहसीलदारांची 8 वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई : दसेगाव गिरणा पात्रातील घटना

दीपक कच्छवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

दसेगाव(ता.चाळीसगाव) : नदिपात्रातुन वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या आठ ट्रॅक्टर चालकांवर महसुल पथकाने कारवाई केली असुन यातील चार ट्रॅक्टर पळुन गेले तर चार मेहुणबारे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. यात काही राजकीय पुढाऱ्यांच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. या कारवाईमुळे वाळमाफीयामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दसेगाव(ता.चाळीसगाव) : नदिपात्रातुन वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या आठ ट्रॅक्टर चालकांवर महसुल पथकाने कारवाई केली असुन यातील चार ट्रॅक्टर पळुन गेले तर चार मेहुणबारे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. यात काही राजकीय पुढाऱ्यांच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. या कारवाईमुळे वाळमाफीयामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दसेगाव गिरणा पात्रातून गेल्या अनेक दिवसापासून वाळूची चोरटी वाळू  वाहतूक सुरू आहे. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दसेगाव गिरणा पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती तहसीलदार कैलास देवरे यांना मिळाली. माहीती मिळताच त्यांच्या पथकाने आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दसेगाव गिरणा पात्रातील वाॅटर सप्लाय जवळच्या भागात अचानक धडक दिली. या ठिकाणी आठ ट्रॅक्टर वाळूची भरताना मिळुन आली. यातील चार ट्रॅक्टर चालकांनी अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर पळवून नेले. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता.

ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा
दसेगाव गिरणा पात्रात जप्त करण्यात आलेली ट्रॅक्टर ही मेहुणबारे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली असुन तलाठी आर.डी नन्नवरे यांनी ट्रॅक्टर चालक व मालकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यात ट्रॅक्टर  क्रमांक (mh 19 BG 6826) मालक धर्मा रावते, तर चालक सुरेश पाटील, ट्रॅक्टर क्रमांक ( MH.19 CY 515) नितीन देशमुख व  चालक सुनिल मरसाळे, ट्रॅक्टर क्रमांक  MH.39.AN 3948 मालकाचे नाव मुन्ना पाटील व चालक सखाराम पाटील, तर चौथे ट्रॅक्टर ( Mh.19 BJ 1202 ) मालक भुषण पवार,चालक राजेंद्र राठोड या चारही ट्रॅक्टरचे चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अनिल देशमुख हे करीत आहेत. ही कारवाई  नायब तहसीलदार नानासाहेब अगळे, बी.एल.येडे, एन.के.अहीरे, वाल्मिक शेळके,संजय चव्हाण यांनी केली.

भऊर येथील वाळू लिलावास स्थगिती
भऊर (ता.चाळीसगाव) येथील गिरणा पात्रातील वाळू लिलाव हा जिल्हा प्रशासनाने 70 लाखाला दिला होता. या लिलावाच्या विरोधात भऊर येथील ग्रामस्थांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. याला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिल्याचे वृत्त आहे. मात्र चाळीसगाव महसुल प्रशासनाला अजुन अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याची माहिती तलाठी आर.डी.नन्नवरे यांनी दिली.

ट्रॅक्टर चालकांची अरेरावी 
दसेगाव गिरणा गिरणा पात्रात महसूल पथकाने छापा टाकला असता या ठिकाणी आठ ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येऊन ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले असता चालकांनी तलाठी नन्नवरे यांना शिवीगाळ करून दमदाटी करत चार ट्रॅक्टर पळवून नेले. वाळुचोरांची मुजोरी वाढल्याने एकाद्यावेळी महसुल कर्मचार्यांचा जीव घेण्यासही ते मागे - पुढे पहाणार नाही, असे पथकातील कर्मचार्यानी सांगितले.

Web Title: esakal marathi news chalisgaon news