चाळीसगाव : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेला मदतीचा धनादेश

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 24 जानेवारी 2018

पखेड येथील रहिवासी गायत्री पाटील या 6 डिसेंबरला शेतात कापूस वेचणी करीत होत्या. त्यादरम्यान त्यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. वनविभागातर्फे मदत म्हणून एक लाखांचा धनादेश मंगळवारी(ता. 23) उपखेड येथे त्या महिलेकडे सुपूर्द करण्यात आला.

पिलखोड(ता.चाळीसगाव) : उपखेड येथील महिलेवर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्या महिलेला मंगळवारी(ता.23)वन विभागातर्फे मदतीचा एका लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

उपखेड येथील रहिवासी गायत्री पाटील या 6 डिसेंबरला शेतात कापूस वेचणी करीत होत्या. त्यादरम्यान त्यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. वनविभागातर्फे मदत म्हणून एक लाखांचा धनादेश मंगळवारी(ता. 23) उपखेड येथे त्या महिलेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपखेडचे सरपंच महेश मगर, माजी सरपंच छोटू मगर, पोलीस पाटील अशोक सोनवणे, वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक प्रकाश पाटील हे उपस्थित होते.

Web Title: esakal marathi news chalisgaon news women gets help