कापडणे येथे पावरा कुटूंबाला शिक्षक मित्रांकडून भरीव मदत

जगन्नाथ पाटील
रविवार, 14 जानेवारी 2018

कापडणे(ता.धुळे) : येथील इंदिरानगरमधील साहेबू पावरा यांच्या झोपडीवजा घराला काल(ता.13)  सकाळी अकराला आग लागली होती.  आगीची तीव्रता इतकी होती की पंधरा वीस मिनिटांत घर जळून खाक झाले होते. हे वृत्त 'सकाळ'मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर मदतीचा ओघ सुरु झाला आहे. येथील शिक्षकांनी संसारोपयोगी वस्तूंची मदत केली. तर महसुल विभागानेही आज पंचनामा केला. 

'सकाळ'च्या बातमीनंतर पंचनामा
आज 'सकाळ'मध्ये साहेबू पावरा यांची खाक झालेली झोपडी आणि उघड्यावर आलेल्या संसाराविषयी सविस्तर बातमी प्रसिध्द झाल्यानंतर तलाठी विजय बेहरे व रवींद्र भामरे यांनी पंचनामा केला.

विशालच्या शिक्षकांनी केली मदत   
साहेबू पावरा यांचा मुलगा जिल्हा परीषद शाळा क्रमांक तीनमध्ये तिसरीत आहे. त्याने शिक्षकांना रडत सर्व माहिती सांगितली. विद्या पाटील, हर्षदा बोरसे, स्मिता सराफ व ज्ञानेश्वर बोरसे यांनी संसारोपयोगी साहित्याची मदत केली.

मकर संक्रांत पावरांच्या घरी   
मनोज पाटील, अमोल बोरसे, योगेश पाटील, प्रशांत पाटील, राकेश पाटील या शिक्षक मित्र आज सकाळी पावरा यांच्या घरी गेलेत. एका महिन्याचा किराणा सुपूर्त केला. पुरणपोळीचे जेवण खावू घातले. विशाल व गुड्डू पावरा या भावंडांना नवे ड्रेस घेवून दिलेत. एक कृतज्ञतेच्या भावनेने मकर संक्रांत साजरी केली. दरम्यान ग्रामपंचायत सदस्या जया पाटील, इंजिनिअर गांगूर्डे आदींकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

Web Title: esakal marathi news dhule news sakal news impact poor family gets help