पोलिस क्रीडा स्पर्धेतही विजय चौधरी यांची सुवर्ण कामगिरी

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पिलखोड(ता. चाळीसगाव) : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी 30 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत विजयी होत सुवर्ण पदक जिंकून सुवर्ण कामगिरी केली आहे. 

पिलखोड(ता. चाळीसगाव) : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी 30 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत विजयी होत सुवर्ण पदक जिंकून सुवर्ण कामगिरी केली आहे. 

मुंबई येथे 6 ते 11 जानेवारी दरम्यान 30 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यातील 8 परिक्षेत्र, 4 आयुक्तालय व एक प्रशिक्षण संचनालय यांचे 13 संघ सहभागी होते. प्रत्येक संघात प्रत्येकी दोन खेळाडू सहभागी होते. नाशिकच्या प्रशिक्षण संचनालयातर्फे विजय चौधरी हे सहभागी झाले होते. विजय चौधरी यांनी 125 किलो वजनी गटात खेळत सुवर्ण पदक जिंकून सुवर्ण कामगिरी केली. अंतिम सामन्यापर्यंत विजय यांच्या चार कुस्त्या झाल्या. अशी माहिती महाराष्ट्र पोलीस कुस्ती संघाचे प्रशिक्षक हणमंत जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विजय हे तब्बल नऊ महिन्यांनी कुस्तीच्या आखाड्यात उतरले. डीवायएसपी पदाचे त्यांचे प्रशिक्षण सध्या नाशिक येथे सुरू आहे. गेल्या महिन्यात विजय गावच्या कुस्त्यांना हजर होते. आगामी होऊ घातलेल्या हिंद केसरी स्पर्धेत खेळणार असल्याचे विजय यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले होते.  

 

Web Title: esakal marathi news vijay choudhari wrestling news