राजमाने येथे तनिष्का गटाची स्थापना

दीपक कच्छवा
शनिवार, 12 मे 2018

राजमाने (ता.चाळीसगाव) येथे आज 'सकाळ' माध्यम समूहाच्या 'तनिष्का व्यासपीठाची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत तनिष्कांसह 'सकाळ' 'रिलीफ फंडा'तून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती जाणून घेतली.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : राजमाने (ता.चाळीसगाव) येथे आज 'सकाळ' माध्यम समूहाच्या 'तनिष्का व्यासपीठाची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत तनिष्कांसह 'सकाळ' 'रिलीफ फंडा'तून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती जाणून घेतली. बैठकीत स्त्री प्रतिष्टेचा जागर करून 'सकाळ' च्या माध्यमातून नाला खोलीकरणाचे काम करून गावाचा पाणीप्रश्न सोडवण्याचा  निर्धार केला.
  
राजमाने व कळमडु (ता.चाळीसगाव)  येथील 'तनिष्का' सदस्या व ग्रामस्थांची आज सकाळी दहाला राजमाने येथील जिल्हा परिषदेच्या बैठक झाली. बैठकीत तनिष्का व्यवस्थापक अमोल भट  अध्यक्षस्थानी होते. सुरवातीला चाळीसगाव विभागीय कार्यालयाचे उपसंपादक अनन शिंपी यांनी प्रस्ताविक केले. त्यानंतर अमोल भट यांनी 'सकाळ' रिलीफ फंडा च्या कामांबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रात 36 जिल्ह्य़ात सध्या 'सकाळ' रिलीफ फंडातून कामे सुरू असून ज्या गावांना दुष्काळस्दृश्य परिस्थिती आहे.

आशा गावांची निवड करून त्या गावांना 'सकाळ'तर्फे मदतीचा हात दिला जात आहे. यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे भट यांनी शंकांचे निरसन केले. यावेळी कळमडु येथील भैय्यासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी राजमाने- कळमडुच्या 'तनिष्कांनी' नी राजमाने गावाचा पाणीप्रश्न सोडविण्याचा एकमताने निर्धार केला. बैठकीला 'तनिष्का' सदस्या मोनिका सोनवणे, पुनम सोनवणे, शैला सोनवणे,उषाबाई सोनवणे,उन्नती पाटील,प्रमिला बोरसे, मनिषा पाटील, शोभाबाई पाटील, निर्मला पाटील, हेमलता निकम,मंगलबाई पाटील, अनिता पाटील, अनिता पाटील, राजश्री शिंपी, सुशिलाबाई सोनवणे, योगिता निकम, मंगल बागुल, सुरेखा पटाईत, प्रतिभा बागुल,  लताबाई निकम, रंजना केदार यांच्यासह महिला उपस्थितीत होत्या.

नाल्याची पहाणी

राजमाने येथे 'सकाळ' रिलीफ फंडातून करण्यात येणाऱ्या नाला खोलीकरणाच्या कामासंदर्भात अमोल भट व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पहाणी केली. या नाल्याचे खोलीकरण झाल्यास गावाजवळील विहीरींचा फायदा होऊन पाण्याची पातळी वाढेल. शिवाय सिंचनाला देखील चांगला लाभ होईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी मेहुणबारे येथील 'सकाळ' चे बातमीदार दीपक कच्छवा, पिलखोडचे बातमीदार शिवनंदन बाविस्कर, दिलीप पाटील, दयाराम पाटील गोरक पाटील, पुरूषोत्तम पाटील,सुरेश पाटील, शरद पाटील, सुनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Web Title: Establishment of Tanishka group at Rajdhani