एव्हरेस्टवीर चंद्रकला गावित लक्षाधीश!

भिलाजी जिरे
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पुरस्कारार्थी एव्हरेस्टवीर
एव्हरेस्टवीर असे - चंद्रकला उत्तम गावित (इंदवे, धुळे), मुन्ना साबुलाल धिकार (टेंबली, धारणी), अंतुबाई अनारद्रव कोटनाके (आसापूर, चंद्रपूर), मनोहर गोपाळ हिलीम (वाघेरा, नाशिक), हेमलता अंबादास गायकवाड (अलंगण, कळवण), केतन सीताराम जाधव (देवगाव, जव्हार), अनिल पांडुरंग कुंदे (बोरीपाडा, नाशिक), सूरज देवराव आडे (देवाढा, चंद्रपूर), सुग्रीव आत्माराम मंदे (चिखलदरा, धारणी), शिवचरण बिसराम भिलावेकर (बिजुधावडी, धारणी), सुषमा वासुदेव मोरे (कापरा, पांढरकवडा).

वार्सा - आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षी राबविलेल्या ‘मिशन शौर्य’ मोहिमेअंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रकला गावितसह नऊ एव्हरेस्टवीरांना शासनातर्फे प्रत्येकी २५ लाखांच्या बक्षिसाने गौरविण्यात येणार आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस मिळणार आहे. शासनाने या निर्णयातून शाबासकीची थाप दिल्याने विद्यार्थ्यांचा हुरूप वाढला आहे.

गेल्या एप्रिलमध्ये ‘मिशन शौर्य’चा दुसरा टप्पा राबविण्यात आला. यात राज्यातील शासकीय आणि अनुदानित आदिवासी आश्रमशाळांतील अकरापैकी नऊ विद्यार्थ्यांनी २३ मेस एव्हरेस्ट शिखर सर करण्याची धाडसी मोहीम पूर्ण केली. त्यांच्यावर बक्षिसाचा वर्षाव करतानाच सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. यात मोहगाव (ता. साक्री) येथील रहिवासी तथा इंदवे (ता. साक्री) येथील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी चंद्रकला उत्तम गावितचा समावेश आहे. तिलाही २५ लाखांचा पुरस्कार मिळेल. या एव्हरेस्टवीरांनी राज्याच्या लौकिकात भर घातल्याने त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे.   

ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सुमारे पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासमोर उच्च ध्येय ठेवल्यास ते गाठण्यासाठी ते सर्वतोपरी कठोर परिश्रम घेतील, आदर्श निर्माण करतील या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूरस्थित एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी व चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everest Chandrakala Gavit Millionaire Award