इव्हीएम मशिनच्या प्रतिकृतीची बहुजन समाज पक्षातर्फे होळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

बहुजन समाज पक्षातर्फे आज दुपारी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर इव्हीएम मशिनच्या प्रतिकृतीची होळी करीत राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांसह उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाचा जोरदार निषेध करण्यात आला.

नाशिक - बहुजन समाज पक्षातर्फे आज दुपारी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर इव्हीएम मशिनच्या प्रतिकृतीची होळी करीत राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांसह उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाचा जोरदार निषेध करण्यात आला.

भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोग यांनी संगनमताने इव्हीएम मशिनमध्ये घोळ करून लोकशाहीला उद्‌ध्वस्त करण्याचा डाव रचला आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिकांसह जिल्हा परिषद निवडणुका व उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या साथीने संबंधित इव्हीएम मशिनमध्ये प्रोग्रॅम तयार केल्याचा आरोप या वेळी पक्षातर्फे करण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष लालचंद शिरसाठ यांच्यासह प्रदेश महासचिव शांताराम तायडे, प्रदेश सचिव डॉ. संतोष अहिरे, नितीन चंद्रमोरे, सुजीत साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: EVM machined burned in Nashik