Navratri 2023 : सोनगीर रथाची हुबेहूब लाकडी प्रतिकृती; अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अभिषेकची कलाकारी

Abhishek Lohar
A small replica of a chariot.
Abhishek Lohar A small replica of a chariot.esakal

Navratri 2023 : येथे घटस्थापनेपासून रथोत्सव सुरू झाला असून, २५ ऑक्टोबरला रथयात्रा निघेल. येथील रथ हा भव्य, उंच तसेच उत्कृष्ट कलाकुसरीचा नमुना असून, रथावर बारीक कोरीव काम, नक्षी व मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यामुळे रथाचे आकर्षक रूप मन प्रसन्न करते.

त्यामुळे असाच हुबेहूब दुसरा रथ बनविणे अगदीच अशक्य नसले तरी कठीण मात्र नक्की आहे.( exact wooden replica of chariot by Abhishek dhule news )

या पार्श्‍वभूमीवर भूमितीतील समरूपता घटकाचा योग्य वापर करून एका युवकाने रथाची लहान हुबेहूब प्रतिकृती बनविली आहे. साधारणतः दीड ते दोन फुटांचा हा लाकडी लहान रथ पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

येथील अभिषेक कैलास लोहार (वय २१) या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या युवकाने हा रथ बनविला आहे. मोठ्या रथावरील कोरीव काम, रथावर अर्जुन, घोडे, भालदार, चोपदार अशा मूर्ती हुबेहूब लहान रथावर पाहायला मिळतील. एवढेच काय मोठ्या रथावरील मूर्तींचे रंग लहान रथावरील मूर्तींनाही दिले आहेत.

Abhishek Lohar
A small replica of a chariot.
Navratri 2023 : सातवी माळ; भूत,पिशाश्चाचा सर्वनाश करणारी माता काळरात्री, देवीला हाच नैवेद्य द्या

दोन्ही रथ शेजारी उभे केल्यास उंची व जाडीचा फरक वगळता काहीच फरक दिसणार नाही. मूळ रथाचा कळसासारखाच कळस बनविण्यासाठी दिला आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कळस ठेवला आहे. रथयात्रेच्या दिवशी लहान रथाचीही मिरवणूक काढण्यात येईल, असे कैलास लोहार यांनी सांगितले. रथाला ज्याने पाहिले त्याच्या तोंडून आपसूकच कौतुकाचे बोल बाहेर पडतात.

''आमचा खानदानी व्यवसाय लाकडी बैलगाडी बनविण्याचा आहे. लहानपणापासूनच उरलेल्या लाकडी तुकड्यांपासून लहान गाडे, खेळणी, बैल, घोडे व इतर साहित्य बनवायचो. दोन वर्षांपूर्वी रथ बनविण्याचा निश्चय केला. अभियांत्रिकी अभ्यासाचा ताणातून वेळ मिळाला, तसे काम करीत रथ पूर्ण केला. लोकांचे कौतुक हीच माझ्या कलेची पावती होय.'' अभिषेक लोहार, रथाची प्रतिकृती साकारणारा कलाकार

Abhishek Lohar
A small replica of a chariot.
Navratri Festival : नवरात्रोत्सवातील उत्साह पोचला टिपेला, करवीर निवासिनी अंबाबाईची उद्या नगरप्रदक्षिणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com