सटाण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हवा अतिरिक्त निधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

सटाणा - सटाणा नगरपरिषदेच्या हद्दीत आरम नदीपात्रात महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे व जिजामाता उद्यानाजवळ कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाने अतिरिक्त निधी द्यावा अशी आग्रही मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची मुंबई येथे भेट घेवून केली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

यावेळी बोलताना श्री मोरे म्हणाले, शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता आरम नदीचे पाणी आडवणे आवश्यक आहे. पिण्याचा व सिंचनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या हद्दीत आरम नदीपात्रात महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे व जिजामाता उद्यानानजीक मोरेनगर हद्दीत दोन स्वतंत्र कोल्हापूर सारखे बंधारे बांधण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार करून केला आहे. भूजलपातळीचे सर्वेक्षणही सहा महिन्यापूर्वी केले आहे.

यामुळे, आरम नदीवरील बंधारे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे काम शासकीय मापदंडात बसत नाही. त्यासाठी शासनाकडून जास्त निधीची आवश्यकता आहे. ही बाब केंद्रीय स्वरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार मंत्री भामरे यांनी पालिका पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व वाढीव निधी देण्याची मागणी केली. लवकरच अतिरिक्त निधी प्राप्त होवून दोन्ही बंधारे बाधून शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागेल असा आशावादही श्री मोरे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Extra funds to combat the water dispute of satana