फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी श्री मंगळदेव ग्रहाला साकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अमळनेर ः सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटत नसल्याने देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आमदार स्मिता वाघ व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी श्री मंगळदेवग्रह मंदिरात काल (ता. ५) महाभिषेक करून साकडे घातले. 

अमळनेर ः सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटत नसल्याने देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आमदार स्मिता वाघ व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी श्री मंगळदेवग्रह मंदिरात काल (ता. ५) महाभिषेक करून साकडे घातले. 
बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार, भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, उमेश वाल्हे, शालिग्राम पवार, नाटेश्वर पाटील, राकेश पाटील, राजू पवार, दीपक पाटील, सरपंच कैलास पाटील, किर्तीलाल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष योगिराज चव्हाण, देवा लांडगे, कल्पेश पाटील, दौला भाऊ, शुभम पाटील, भूषण पाटील, महावीर मोरे, अभिषेक पाटील, राजेश वाघ, राहुल चौधरी, असिफ पिंजारी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या महाभिषेकमध्ये सहभाग घेतला. 
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीला जनादेश मिळाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. मात्र, जागा वाटपावरून युतीत घोडे अडल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख लांबत चालली आहे. प्रत्यक्षात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत उत्तम काम केले असून, पुन्हा तेच नेतृत्व राज्याला लाभावे, अशी जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, तिढा सुटतच नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळ असून या कार्यात त्यांना मंगळच आडवा येत असल्याचे काही भाजप कार्यकर्त्यांना मिळाली. भारतात अमळनेर व कोलकता या दोनच ठिकाणी मंगळग्रह देवाची मंदिरे असल्याने त्यांनी आमदार स्मिता वाघ व उदय वाघ यांचे निवासस्थान गाठून यासंदर्भात चर्चा केली. त्यांच्याच सूचनेनुसार मंगळग्रह मंदिर गाठून पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत महाभिषेक करण्यात आला. 

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत, ही तमाम शेतकरी बांधवांची आणि जनतेची इच्छा आहे. खरेतर तो दिवस दूर नाहीच हा आमचा विश्वास आहे. मात्र, भावनाशील झालेल्या कार्यकर्त्यांनी मंगळ आडवा येऊ नये यासाठी महाअभिषेख करून देवाजवळ आपल्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या आहेत. 
- स्मिता वाघ,  आमदार अमळनेर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fadnvis cm mangalgrah tempal BJP abhishek