बनावट नोटा प्रकरणातील आणखी एक पोलिसांच्या रडारवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - बनावट नोटा छपाई प्रकरणामध्ये आणखी एकाचा सहभाग निश्‍चित झाला असून, त्याच्या मागावर पोलिस आहेत. येत्या काही दिवसांत पोलिस त्यास अटक करतील असे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत. आडगाव पोलिसांनी गेल्या महिन्यात एक कोटी 35 लाखांच्या बनावट नोटांसह संशयित व मुख्य सूत्रधार छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी, संदीप सस्ते यांच्यासह 11 संशयितांना अटक केली होती, तर छबू नागरे याला बनावट नोटा छपाईमध्ये तांत्रिक मदत करणारा कृष्ण अग्रवाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक - बनावट नोटा छपाई प्रकरणामध्ये आणखी एकाचा सहभाग निश्‍चित झाला असून, त्याच्या मागावर पोलिस आहेत. येत्या काही दिवसांत पोलिस त्यास अटक करतील असे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत. आडगाव पोलिसांनी गेल्या महिन्यात एक कोटी 35 लाखांच्या बनावट नोटांसह संशयित व मुख्य सूत्रधार छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी, संदीप सस्ते यांच्यासह 11 संशयितांना अटक केली होती, तर छबू नागरे याला बनावट नोटा छपाईमध्ये तांत्रिक मदत करणारा कृष्ण अग्रवाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, बाराही संशयित सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे; परंतु अद्याप त्यास अटक करण्यात आलेली नसून पोलिस त्या संशयिताच्या मागावर आहेत. या प्रकरणी छबू नागरे याच्या नजीकच्या कुटुंबीयांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. 

Web Title: Fake currency case