बनावट डॉक्टर निघाला बांगलादेशी नागरिक, नांदगावात खळबळ 

doctor
doctor

नांदगाव - अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेला बोगस डॉक्टर बांगलादेशी नागरिक निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशात प्रवास करण्यासाठी निघाला असतांना पश्चिम बंगालच्या हरदासपूरच्या इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या तपासात त्याची आई यापूर्वीच भारतात येऊन गेल्याचा संदर्भ मिळाला होता. त्यातून बनावट पासपोर्टवर प्रवासाला निघालेल्या या मुन्नाभाईचा पर्दाफाश झाला. 

अवघी इयत्ता आठवीपर्यंत शिकलेला कथित रतन तरून चक्रबोतीसह वर्षांपूर्वी तालुक्यातील पिंप्री हवेली येथे स्थायिक झाला. याठिकाणी कपड्याचा व्यवसाय करीत बंगाली डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील आपले प्रस्थ निर्माण केले होते. पॅन कार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र खोटेपणाने प्राप्त केले. या कागद पत्रांच्या आधारे बांगलादेशी ही मुळ ओळख लपवून त्याने भारतीय पासपोर्ट मिळविला. त्यानंतर रतन चक्रबोती भारतीय नागरिक म्हणून बांगलादेशात जाण्यासाठी निघाला होता.

हरदासपूर (प. बंगाल) येथील मुख्य इमिग्रेशन अधिकारी यांना त्याची कागदपत्रे तपासतांना त्याची आई यापूर्वी भारतात येऊन गेल्याचा संदर्भ मिळाला आणि येथेच चक्रबोतीचा पर्दाफाश झाला. इमिग्रेशनच्या तल्लख अधिकाऱ्याने हे कोडे सोडवले. रतनच्या पासपोर्टवर असलेल्या माहितीमध्ये तुलू चक्रबोती हे त्याच्या आईचे नाव होते. तुलू हे नाव यापूर्वी भारतात बांगलादेशी पासपोर्ट वर येऊन गेलेल्या बांगलादेशी महिलेचे आहे. हे लक्षात आल्याने हरिदासपुरच्या अधिकाऱ्यानी रतनचा पासपोर्ट रद्द करून वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवली आणि नांदगावचे पोलिस या तोतया नागरिकाच्या घरी पोहोचले. 

दरम्यान जेमतेम ८ वी पर्यन्त शैक्षणिक मजल मारलेल्या रतनने डॉक्टर (बंगाली) म्हणून पिंपरी हवेली परिसरात मान्यता मिळविली होती. याचा प्रत्यय त्याला ताब्यात घेतांना झालेल्या स्थानिक नागरिकांच्या विरोधातून आला. भारतीय पासपोर्ट मिळवितांना उपरोल्लिखित ओळखपत्रे सादर केल्याने व त्याच्या नावावर गुन्ह्याची नोंद नसल्याने तत्कालीन नांदगाव पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी त्याला ना हरकत दाखला दिला. अशी माहिती फिर्यादी पोलिस शिपाई पंकज देवकाते यांनी एफ. आय. आरमध्ये दिली आहे. नमूद पासपोर्टच्या आधारे तो हरिदासपूर मार्गे बांगला देशात जाण्याच्या तयारीत असतांना इमिग्रेशन अधिकारी यांच्या हुशारीमुळे तो पकडला गेला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ससाणे
बोगस डॉक्टर्सच्या सर्व्हेक्षणात रतन चक्रबोती आपल्या रडारवर आलाच नाही. तो वैद्यकीय प्रक्टीस करतो याची माहिती नव्हती. तालुक्यात पाच बंगाली डॉक्टर्स आहेत. ते नेचरोपथी पद्धतीने उपचार करतात. धाडी टाकल्या असतांना अॅलोपॅथीची औषधे त्यांच्याकडे सापडली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com