Family Welfare Surgery Camp : कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांसाठी सर्जन मिळत नसल्याने कॅम्प बंद!

Family Welfare Surgery Camp
Family Welfare Surgery Campesakal

वकवाड (जि. धुळे) : येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात चार महिन्यांपासून कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया कॅम्प बंद असून, शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिला आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात रोज कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया कॅम्प कधी सुरू होणार, अशी विचारणा करतात. मात्र त्यांना उद्धटपणे उत्तरे दिली जातात, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. (Family Welfare Surgery Camp closed as surgeons not available for family welfare surgeries dhule news)

आरोग्य विभागाकडून आदिवासी महिलांना कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांपासून विनाकारण वंचित ठेवले जात आहे. आरोग्य विभागाच्या मनमानी कारभारामुळे आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रियागृह असून नसल्यासारखे झाले आहे.

मागील एक वर्षात सप्टेंबर महिन्यात दोन कॅम्प घेण्यात आले. त्यात २५ केसेस करण्यात आल्या. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी सर्जन मिळत नसल्यामुळे वकवाड आरोग्य केंद्रातील कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिर बंद ठेवण्यात आले आहे.

पळासनेर-बोराडी मार्गावर वकवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, आदिवासी दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी ते महत्त्वाचे केंद्र आहे. केंद्रांतर्गत उर्मदा, मोहिदा, पळासनेर, गुहाडपाणी व वकवाड अशी पाच उपकेंद्रे आहेत. यात वकवाड, दुर्बड्या, झेडेअंजन, निमबारी, उर्मदा, चोंदी, बुडकीविहीर, दोंदवाडा, गुऱ्हाळपाणी, मोहिदा, हातेड, शेमल्या, काकळमाड, बटवापाडा, गुऱ्हाळपाडा, काळापाणी १६ गाव-पाड्यांचा समावेश होतो.

Family Welfare Surgery Camp
Jindal Fire Accident : लष्कराने दिले 2 हेलिकॉप्टर अन् जवान!

केंद्रात चार वैद्यकीय अधिकारी असून, त्यांच्या मदतीला १८ ते २० कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. १०२ सह दोन रुग्णवाहिका आहेत. रोज ४० ते ५० बाह्यरुग्ण उपचारांसाठी येत असतात. दर महिन्याला २० ते २५ महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. मात्र चार महिन्यांपासून येथील आरोग्य केंद्राला शस्त्रक्रियेसाठी सर्जन मिळत नसल्यामुळे कुटुंबकल्याणच्या शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत.

गरजू महिलांना शिरपूर, शेंदवा, नेवाली येथे जाऊन स्वखर्चाने खासगी किंवा सरकारी रुग्णालयात कुटुंबकल्याणच्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे आदिवासी महिलांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

यात महिलांची गैरसोयही होत असल्याने व काही आदिवासी महिलांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना बाहेरगावी शस्त्रक्रियेसाठी जाणे शक्य नसल्याने त्या शस्त्रक्रियेपासून वंचित आहेत. आरोग्य विभागाविषयी महिलांचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Family Welfare Surgery Camp
Atal Bhujal Yojana : भूजलपातळी घटलेल्या गावांवर भर देणार; राज्यातील 1339 गावांचा समावेश

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेत सर्जनची व्यवस्था करावी व वकवाड केंद्रातील ठप्प असलेले ऑपरेशन कॅम्प सुरू करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

वकवाड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पवार यांनी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया होत नसल्याने वरिष्ठ जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले व तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांना लेखी पत्रही दिले आहे.

"सर्जन मिळत नसल्यामुळे कॅम्प बंद ठेवण्यात आले आहेत. सर्जन मिळाल्यास त्वरित कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांसाठी शिबिरे घेतली जातील."

डॉ. चंदन पवार, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, वकवाड

Family Welfare Surgery Camp
Jindal Accident : जिंदाल कंपनी दुर्घटनेतील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक कार्यान्वित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com