
शेतकरयांना 750 प्रती किंव्वटल भाव देवून शेतकरयांना ' भुरळ ' घातली आणि उधारीने कांदा खरेदी सुरू केली.
चिमठाणे : दराणे (ता.शिंदखेडा) येथील ' पिंजारी ' नामक स्व:ताला कांदयांचा व्यापारी समजणारयांने चिमठाणे, दलवाडे (प्र.सोनगीर),तामथरे, रोहाणे , बोरीस (ता.धुळे) आदी गावातील शेतकरयांचा शेकडो किंव्वटल कांदयांचे कोटी रुपयाला चुना लावला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी शेतरयांना न्याय मिळवून द्यावा अशी शेतकरयांनी विनंती केली आहे.
वाचा- खोदा पहाड निकला चुहा.. राज्यातील सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवरील शिक्षकांची स्थिती
दराणे येथील घरदार नसलेल्या ' पिंजारी ' नामक कांदा व्यापारी यांने चिमठाणे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरयांना घेरले .आॅगस्ट - सप्टेंबर महिन्यात रब्बी कांदयांचा प्रती किंव्वटल भाव 500 ते 650 होता. माञ या महाभाग व्यापारी यांने शेतकरयांना 750 प्रती किंव्वटल भाव देवून शेतकरयांना ' भुरळ ' घातली आणि उधारीने कांदा खरेदी सुरू केली. यातच ' शेतकरी राजा ' मोहाला बळी पडला आणि तेथेच शेतकरयांची फसवणूक झाली.
'त्या ' व्यापारयांचा मुक्काम ढाब्यावर!
तथाकथीत कांदा व्यापारीचा मुक्काम सोनगीर - दोंडाईचा राज्य महामार्गावरील दराणे (ता.शिंदखेडा) फाटयाजवळ असलेल्या एका ढाब्यावर होता. शेतकरयांनी तरी ' त्या ' व्यापारीला कांदा विकला होता. आता शेतकरी ' त्या ' ढाब्यावर तपास करण्यासाठी जातात तर ढाबा मालक म्हणतात की , तो आम्हालाही ' चुना ' लावून गेला आहे.
आवर्जून वाचा- बँकेत नोकरी लागली; काही दिवसात रुजू होणार तोच तरुणाने उचले टोकाचे पाऊल, आणि सर्वांना विचारात पाडले
27 शेतकरयांना कांदा ने डोळ्यात आणले पानी !
.चिमठाणे, दलवाडे(प्र.नंदुरबार), तामथरे, बोरीस व रोहाणे येथील 27 शेतकरयांचे एक हजार 350 किंव्वटल कांदयांचे सुमारे एक कोटी रूपयाला चुना लावला आहे. शेतकरयांनी ' त्या ' व्यापारयाचा शोध घेतला पण मिळून आला नाही. मोबाईल ही बंद आहे.
" दराणे येथील पिंजारी नामक कांदा व्यापारी याला मी सप्टेंबर महिन्यात 50 किंव्वटल रब्बी कांदा 700 रूपये किंव्वटल दराने विकला होता. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
गोकुळ हनुमंत पाटील, शेतकरी. चिमठाणे, ता.शिंदखेडा.
संपादन- भूषण श्रीखंडे