Dhule : गळफासासाठी दोरी घेऊन शेतकरी कलेक्टर ऑफिसला!

Farmer Yograj Patil came to the agricultural land collector's office with a rope for hanging on Friday.
Farmer Yograj Patil came to the agricultural land collector's office with a rope for hanging on Friday.esakal
Updated on

धुळे : शेतजमीनप्रश्‍नी मागणी केलेले कागदपत्र देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने भोरटेक (ता. शिरपूर) येथील ७१ वर्षीय शेतकरी योगराज रामदास पाटील थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गळफास घेण्यासाठी दोरी घेऊन आले.

त्यामुळे खळबळ उडाली. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांविषयी तक्रार करायची होती. त्यांनी ती केली. (Farmer gone to collector office with rope for hanging dhule Latest Marathi News)

Farmer Yograj Patil came to the agricultural land collector's office with a rope for hanging on Friday.
मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे अतुलनिय योगदान : CM एकनाथ शिंदे

थाळनेर (ता. शिरपूर) शिवारातील एका गटात ३६ एकर दहा गुंठे जमीन आहे. तिचे उतारे दिले जात नाहीत. तरीही शेतजमिनी मोजणी झाली, त्यापेक्षा जास्त प्रमाणात दुसऱ्यास उपलब्ध करून देण्यात आल्याची शेतकरी पाटील यांची तक्रार आहे.

त्याबाबत मागणी करूनही संबंधित अधिकारी पूरक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या जमीन क्षेत्रात त्यांचे वडील (स्व.) रामदास पाटील- जाधव (भोरटेक) यांच्या नावे हिश्‍याची ०.८५ आर जमीन आहे.

त्यात ०.४५ आर शेतजमीन दिलेली आहे, असे खोटे कागदपत्र करून माझे नुकसान केल्याची शेतकरी पाटील यांची तक्रार आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने त्यांनी गळफास घेण्यासाठी दोरी आणून जिल्हाधिकारी कार्यालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला.

Farmer Yograj Patil came to the agricultural land collector's office with a rope for hanging on Friday.
SAKAL Impact : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 8 दिवसात नवीन लोखंडी पूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com